---Advertisement---

पुन्हा मैदानावर दिसणार षटकारांची आतषबाजी; माजी अष्टपैलू युवराजने केली पुनरागमनाची घोषणा

On: मंगळवार, नोव्हेंबर 2, 2021 12:26 PM
Yuvraj Singh
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटी युवराज सिंग याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत बरेचसे किर्तीमान आपल्या नावावर केले आहेत. त्याला क्रिकेटविश्वातील विस्फोटक फलंदाजांमध्ये गणले जाते. हाच युवराज क्रिकेटप्रेमींमध्ये सिक्सर किंग म्हणूनही प्रसिद्ध आहे. २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर फार क्वचितच चाहत्यांना त्याची फटकेबाजी पाहायला मिळते. परंतु आता युवराज पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर उतरणार आहे. त्याने स्वत: सोशल मीडियाद्वारे यासंदर्भात घोषणा केली आहे.

सोमवारी रात्री (०१ नोव्हेंबर) युवराजने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे आपल्या क्रिकेटमधील पुनरागमनाची घोषणा केली आहे. फेब्रुवारी २०२२ पासून तो पुन्हा क्रिकेट खेळण्यास सुरुवात करणार आहे. आपल्या क्रिकेटचाहत्यांच्या मागणीवरुन त्याने हा निर्णय घेतला आहे.

युवराजने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील क्षणचित्रे दाखवणारा व्हिडिओ शेअर केला आहे.  या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘देव तुमचा मार्ग निश्चित करत असतो. फेब्रुवारीच्या महिन्यात मी चाहत्यांच्या मागणीवर पुन्हा क्रिकेटमध्ये पतरणार आहे. तुमचे प्रेम आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला असाच पाठिंबा देत राहा आणि हीच एका खऱ्या चाहत्यांची निशाणी आहे.’

https://www.instagram.com/tv/CVv7NX3DKjg/?utm_source=ig_web_button_share_sheet

भलेही युवराजने त्याच्या क्रिकेटमधील पुनरागमनाची घोषणा केली आहे. परंतु तो कोणत्या क्रिकेट स्पर्धेत खेळताना दिसेल हे अद्याप अस्पष्ट आहे. तो इतर माजी भारतीय क्रिकेटपटूंप्रमाणे रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज खेळताना दिसू शकतो. किंवा ग्लोबल कॅनडा टी२० लीगमध्ये खेळू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

मेन्टॉर धोनी अन् कोच शास्त्रींमध्ये फुटले ‘वादा’चे फटाके? न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यादरम्यानची दृश्ये कॅमेरात कैद

हाव इज द JOS! फलंदाजाचा अंदाज चुकला अन् क्षणभरात बटलरने यष्टीमागून उडवली दांडी

रोहित शर्मासह ‘हे’ ५ खेळाडू ठरले खेलरत्न पुरस्काराचे मानकरी; ईशांत, दिप्तीलाही अर्जुन पुरस्कार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---