---Advertisement---

युवराज सिंगला पोलिसांकडून अटक, कारण आहे युजवेंद्र चहल! वाचा संपूर्ण प्रकरण

On: रविवार, ऑक्टोबर 17, 2021 11:55 PM
---Advertisement---

क्रिकेटविश्वातून रविवारी (१७ सप्टेंबर) खळबजनक बातमी समोर आली. भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगला हरियाणा पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. पण त्याला चौकशीनंतर पुन्हा सोडण्यात आलं.  त्याच्यावर अनुसुचीत जातींविरुद्ध अपमानजनक टिपण्णी करण्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल मुख्य कारण ठरला आहे.

नक्की प्रकरण काय?
युवराज सिंगने गेल्यावर्षी एप्रिलमध्ये भारताचा सलामीवीर रोहित शर्मासह इंस्टाग्राम लाईव्ह व्हिडिओ चॅट केले होते. त्यावेळी त्यांच्या संभाषणादरम्यान युवराजने नकळत युजवेंद्र चहलवर जातीवाचक टिप्पणी केली होती.

रोहित आणि युवराज संभाषण करत असताना त्यावेळी कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल देखील ऑनलाईन होते. याबद्दल चॅटदरम्यान युवराज म्हणाला होता की ‘‘या भंगी लोकांना काही काम नाही. युझीला (चहल) पाहा. कसला व्हिडिओ टाकला आहे, त्याने त्याच्या कुंटुंबासोबतचा. मी त्याला एवढेच म्हणालो की, तू तुझ्या बापाला नाचवत आहेस. तू वेडा तर नाहीस ना.’

युवराजच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांनी त्याच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावेळी ट्विटरवर ‘#युवराज_सिंह_माफी_मांगो’ हा हॅशटॅग ट्रेंड झाला होता.

या प्रकरणाबद्दल त्याच्याविरुद्ध राष्ट्रीय आघाडी आणि दलित मानवाधिकारांचे संयोजक वकील रजत कलसन यांनी हरियाणा पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यांनी एससी एसटी कायद्याअंतर्गत एफआयआर नोंदवली होती. या प्रकरणात यावर्षी फेब्रुवारीमध्ये त्याच्यावर विविध कलमान्वये एफआयआर नोंदवली गेली होती.

या प्रकरणाची चौकशी हरियाणा पोलिस करत होते. दरम्यान, युवराज सिंगने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याने एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती.

युवराजने मागितली होती माफी
हे प्रकरण चिघळल्यानंतर युवराजने ट्विट करत माफी मागितली होती. त्यावेळी त्याने त्याचा कोणालाही दुखावण्याचा हेतु नसल्याचे स्पष्ट करत माफी मागितली होती.

https://twitter.com/YUVSTRONG12/status/1268810700429897728

त्याने म्हटले होते की, ‘मी कोणत्याही प्रकारच्या भेदभावावर विश्वास ठेवत नाही. लोकांच्या कल्याणासाठी मी माझं जीवन जगत आहे. मी माझ्या मित्रांशी बोलत होतो, तेव्हा माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेला. एक जबाबदार भारतीय नागरिक या नात्याने जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी खेद व्यक्त करतो आणि त्यांची जाहीररित्या माफी मागतो. देश आणि देशातील लोकांवर माझे कायमच प्रेम राहील.”

युवराजची सध्या सुटका झाली असून तो चंदीगढ़ला रवाना झाल्याचे समजत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

बिग ब्रेकिंग! क्रिकेटपटू युवराजसिंगला ‘या’ गंभीर प्रकरणात हरियाणा पोलिसांकडून अटक

वुमेन्स बीबीएलमध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला!! राधा अन् शेफालीच्या कामगिरीने सिडनी सिक्सरचा विजय

विराट म्हणतो, ‘२००७ टी२० विश्वचषकाने कारकिर्दीवर मोठा परिणाम झाला, एक तरुण खेळाडू म्हणून मला…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---