भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग रणजी ट्रॉफीमध्ये पंजाबकडून खेळत आहे. यानंतर तो राष्ट्रीय टी20 आणि आयपीएलमध्ये खेळणार असून यामध्ये त्याला उत्तम कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.
रणजीमध्ये पंजाबकडून युवराज बरोबर शुबमन गिल हा युवा खेळाडूही खेळत आहे. त्याने मागील महिन्यातच द्विशतकी खेळी करत सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तो भारतीय वरिष्ठ संघातही आगमन करण्यास उत्सुक आहे.
“गिल हा एक चांगला फलंदाज असून भारतीय संघासाठी खूप काळ खेळण्याची संधी आहे. मात्र त्याला त्याची कामगिरी उत्तम ठेवावी लागेल. तो 2019चा विश्वचषक झाल्यावर नक्कीच संघात आपले स्थान निर्माण करेल”, असे युवराज म्हणाला.
“रिषभ पंतही आला तेव्हा तो ही वाईट शॉट्स खेळत होता. मात्र एक वर्ष संघाबाहेर राहिल्याने आणि आयपीएलमध्ये अप्रतिम खेळत त्याने आता कसोटीमध्ये दोन शतकेही केले आहेत”, असेही युवराज पुढे म्हणाला.
मागील वर्षी न्युझीलंडमध्ये झालेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक भारताने जिंकला होता. यामध्ये गिलने 104. 50च्या सरासरीने 418 धावा केल्या होत्या. यामुळे त्याला मॅन ऑफ टी टुर्नामेंटचा पुरस्कारही मिळाला होता.
रणजीमध्ये गिलने 8 सामन्यात 82.50 च्या सरासरीने 990 धावा केल्या आहेत.
याचबरोबर युवराजने भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात विजय मिळवल्याबद्दल संघाचे अभिनंदन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–विराट म्हणतो, तो जर आमच्या संघात असता तर त्याच्याशी असं नसतो वागलो
–रोहित शर्माने त्या खेळाडूवर भाष्य करुन जिंकली चाहत्यांची मनं
–जगातील सर्वात फाॅर्ममध्ये असलेल्या क्रिकेटरने सचिन-कोहलीच्या विक्रमाला टाकले मागे