---Advertisement---

धोनीनंतर आता युवराज सिंगवर बनणार बायोपिक, हा अभिनेता साकारणार ‘सिक्सर किंग’ची भूमिका!

MS Dhoni Yuvraj Singh
---Advertisement---

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर आता युवराज सिंगचं आयुष्य मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. युवराज सिंगच्या बायोपिकची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आली आहे. हा बायोपिक टी-सीरीजच्या बॅनरखाली तयार होत आहे. भूषण कुमार आणि रवी भागचंदका एकत्र या बायोपिकची निर्मिती करणार आहेत. या बायोपिकच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहते मात्र संभ्रमात पडले आहेत? आता सिक्सर किंगची भूमिका कोण साकारणार? युवराज सिंगच्या भूमिकेत कोण दिसणार? असे प्रश्न पडत आहेत.

मात्र, या बायोपिकमध्ये कोणता अभिनेता क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर करण्यात आलेली नाही. मात्र, युवराज सिंगच्या बायोपिकसाठी टायगर श्रॉफ हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे सोशल मीडियावर अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे. युवराज सिंगने आपल्या मुलाखतीत म्हटले होते की, जर माझा बायोपिक बनत असेल तर त्यात सिद्धांत चतुर्वेदीने त्याची भूमिका साकारावी. वास्तविक, सिद्धांत चतुर्वेदीचा प्लस पॉइंट म्हणजे त्याचे लूक आणि शरीरयष्टी युवराज सिंग सारखीच आहे.

याआधी सिद्धांत चतुर्वेदीने ‘इनसाइड एज’ या क्रिकेटवर आधारित वेब सीरिजमध्ये युवराज सिंगची भूमिका साकारली आहे. मात्र, युवराज सिंगची भूमिका साकारण्याची संधी कोणत्या अभिनेत्याला मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. युवराज सिंगने कॅन्सरशी झुंज देत 2011 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताला चॅम्पियन बनवले होते. तसेच कॅन्सरसारख्या आजारावर मात करून तो क्रिकेटच्या मैदानात परतला.

हेही वाचा-

नवा विश्वविक्रम! 1 ओव्हर 39 धावा, 6 षटकार; युवराज सिंगचा रेकाॅर्ड भांड्यात!
चिन्नास्वामीवर धावांचा पाऊस, स्टार खेळाडूने 48 चेंडूत ठोकल्या तब्बल 124 धावा
आता गौतम गंभीरची जागा झहीर खान घेणार? अहवालात मोठा खुलासा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---