मुंबई । भारताला दोन विश्वचषक जिंकून देणारा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग आता भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा शेजारी बनणार आहे. युवराजने विराटच्या बिल्डिंगमध्येच घर विकत घेतले आहे. मुंबईच्या वरळी येथील ओमकार 1973 टॉवर्समध्ये घर विकत घेतले आहे.
विराट (Virat Kohli) 2016मध्ये ओमकार टॉवर्समध्ये शिफ्ट झाला होता. त्याचे घर 35 व्या मजल्यावर आहे. तर युवराजने (Yuvraj Singh) 29व्या मजल्यावर घर विकत घेतले आहे. तसेच माध्यमांतील काही वृत्तांनुसार त्याचे घर 16 हजार चौरस फूटांचे आहे.
युवराजचे घर विराटच्या घरापेक्षा जवळपास दुप्पट महाग आहे. आर्किटेक्चरल डायजेस्ट डॉट इनच्या वृत्तानुसार, युवराजने हे घेर 64 कोटी रुपयांमध्ये (64 Crore Rupees House) विकत घेतले आहे. त्याने आपल्या फ्लॅटच्या प्रत्येक चौरस फूटसाठी जवळपास 40 हजार रुपये दिले आहेत. विराटने 34 कोटी रुपयांमध्ये घर विकत घेतले होते.
याव्यतिरिक्त भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माही मुंबईच्या वरळी येथे राहतो. त्याने 2017मध्ये घर विकत घेतले होते. त्याचे घर 6 हजार चौरस फूटमध्ये बनले आहे. त्याच्या घरातून अरबी समुद्राचा सुंदर देखावाही दिसतो.
सध्याच्या भारतीय खेळाडूंची चर्चा करायची झाली तर विराट आणि रोहित सर्वात महागड्या घरामध्ये राहत होते. परंतु आता युवराजने या दोघांंनाही खूप मागे टाकले आहे. असे म्हटले जात आहे की, पुढील वर्षापर्यंत युवराज आपली पत्नी हेजल कीचबरोबर (Hazel Keech) आपल्या आलिशान घरामध्ये शिफ्ट होणार आहे.
काही दिवसांपूर्वीच आपल्याला एमएस धोनी व विराट कोहलीने कर्णधार म्हणून पाठींबा न दिल्याचा आरोप युवराजने केला होता. जर आपल्याला योग्य पाठींबा मिळाला असता, तर नक्कीच आपण अजूनही खेळलो असतो, असेही युवराज म्हणाला होता. आता येणाऱ्या काळात हे दोघे शेजारी कसे जुळवून घेतात, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-ब्रेकिंग: इंग्लंड दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजच्या कसोटी संघाची घोषणा
-मजदूरांना अन्न पुरवण्यासाठी या भारतीय गोलंदाजांने लावला घराबाहेर स्टॉल
-चक्क! लॉकडाऊनमध्ये धोनीने विकत घेतला ट्रॅक्टर; पहा तुफान व्हायरल व्हीडिओ