भारतीय संघाच माजी अष्टैपूलू क्रिकेटपटू युवराज सिंग बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतो. मध्यंतरी त्याला बीसीसीआयने सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी खेळण्यास नकार दिल्याने तो चर्चेत आला होता. आता युजवेंद्र चहलबद्दल केलेल्या एका टिपण्णीच्या वादामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
काय होता वाद –
मागील वर्षी युवराजने भारताचा सलामीवीर रोहित शर्मासह लाईव्ह व्हिडिओ चॅट केला होता. त्यावेळी त्याने संभाषण करता करता युजवेंद्र चहलवर एक जातीवाचक टिप्पणी केली होती. ज्यानंतर त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. तसेच युवराज विरोधात बऱ्याच मागण्या होत होत्या. त्यानंतर युवराजने ट्विट करत त्याचा कोणालाही दुखावण्याचा हेतु नसल्याचे स्पष्ट करत माफी मागितली होती.
https://twitter.com/YUVSTRONG12/status/1268810700429897728
पण असे असले तरी हा वाद तेव्हा वाढला, जेव्हा राष्ट्रीय आघाडी आणि दलित मानवाधिकारांचे संयोजक वकील रजत कालसन यांनी युवराज सिंगविरोधात कोर्टात याचिका दाखल केली. त्यावेळी त्यांनी युवराज सिंगला अटक करण्याची मागणी केली होती.
हरियाणा पोलिसांकडून चंदीगढ़ पोलिसांकडे सोपवण्यात आले हे प्रकरण
युवराज विरोधात तक्रार करण्यात आल्यानंतर हे प्रकरण हरियाणा पोलिसांच्या ताब्यात होते. पण आता ते चंदीगढ़ पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पुढील तपास चंदीगढ़ पोलिस करतील. याबाबत हरियाणा पोलिसांनी हिसारच्या विशेष न्यायालयात दाखल केलेल्या स्टेटस अहवालात माहिती दिली आहे. या प्रकरणातील पुढील स्थिती जाणून घेण्यासाठी न्यायालयाने ४ एप्रिल रोजी अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ४ एप्रिलला होणार आहे. मागील सुनावणी हिसारच्या एससी / एसटी कायद्यातील विशेष न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश वेदपाल सिरोही यांच्या समोर केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय क्रिकेटपटूंना फिट बनवण्यासाठी बीसीसीआयने कसली कंबर; आणली ‘ही’ नवी चाचणी
“कोणी पहिलीत बीजगणित शिकत नाही”, रिषभच्या यष्टीरक्षण कौशल्याबाबत ‘या’ क्रिकेटरचे भाष्य