भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली; तरीसुद्धा तो सोशल मीडियामार्फत आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. क्रिकेटच्या मैदानात आक्रमक असणारा युवराज मैदानाबाहेर खूप मस्तीखोर आहे. तो नेहमी आपल्या सहकारी खेळाडूंच्या सोशल मीडिया पोस्टवर मजेशीर प्रतिक्रिया देत पाय खेचत असतो. अशातच भारतीय संघाचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह हा लग्न करत असल्याची चर्चा सुरू आहे. तत्पुर्वी बुमराहच्या एका सोशल मीडिया पोस्टवर युवराजने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील चौथा सामना येत्या ४ मार्च पासून सुरु होणार आहे. अशातच शनिवारी, बुमराहने बीसीसीआयकडे चौथ्या सामन्यापुर्वी त्याला रिलीज करण्यात यावे अशी मागणी केली होती. यावरून सर्वांनी अंदाज लावला होता की, बुमराहने विश्रांतीसाठी चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली असावी.
परंतु आता बुमराह लग्न करत असल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे. अशातच बुमराहने त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावर युवराजने बुमराहची मजा घेत गमतीशीर प्रतिक्रिया दिली. त्याने लिहले, “फरशी पुसू की झाडू मारू?”
जसप्रीत बुमराह इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात नसणार आहे. यासोबतच १२ मार्च पासून सुरु होणाऱ्या टी -२० मालिका आणि २३ मार्च पासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत देखील तो संघात नसेल. त्याने लग्नाच्या पूर्व तयारीसाठी मालिकेतून माघार घेतल्याचे म्हटले जात आहे.
Paucha marun pehle yah jhadu ?😁🤪
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) March 2, 2021
कसोटी मालिकेत भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे. अशातच चौथा सामना भारतीय संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणार आहे. हा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिका तर जिंकणार. यासोबतच त्यांना विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी मिळणार आहे. मात्र त्यांना बुमराहच्या जाण्याने चौथ्या कसोटीत फारसा फरक जानवणार नाही. कारण सध्या भारताकडे बुमराहच्या जागी उमेश यादव किंवा मोहम्मद सिराज यांचे पर्याय उलपब्ध आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मॅक्सवेल फॉर्ममध्ये आला रे! एकाच षटकात चोपल्या २८ धावा अन् मोडली खुर्ची, टीकाकारांची बोलती बंद
“क्रिकेटपासून जरा लक्ष दुसरीकडे वळवा, तरच…”, कर्णधार जो रूटचा संघ सहकार्यांना सल्ला
‘या’ शहरात आयोजित व्हावे आयपीएलचे सामने, थेट मुख्यमंत्र्यांचीच बीसीसीआयला विनंती