रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज 2022च्या हंगामात इंडिया लीजेंड्स संघाचे भाग घेतला. टी20 प्रकारच्या या स्पर्धेत इंडियाने पहिल्या सामन्यात साऊथ आफ्रिका लीजेंड्स यांच्यावर 61धावांनी विजय मिळवला. इंडियाच्या संघाचे नेतृत्व सचिन तेंडूलकर करत आहे. तर याच स्पर्धेत खेळणाऱ्या युवराज सिंगने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. हा व्हिडिओ इंडियाच्या ड्रेसिंग रूममधील दिसत आहे. यामध्ये इरफान पठाण आणि सुरेश रैना हे मौजमजा करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ नेटकऱ्यांना खूपच आवडला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग (Yuvraj Singh) हा हरफनमौला स्वभावासाठी ओळखळा जातो. त्याने आयसीसी 2011चा वनडे आणि 2007चा टी20 विश्वचषक यांमध्ये महत्वाची भुमिका पार पाडली. आता सध्या तो रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीडमध्ये खेळत आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केला आहे. यामध्ये सुरेश रैना (Suresh Raina) आणि इरफान पठाण (Irfan Pathan) हा गाणे म्हणत आहे. तर युवराज डान्स करताना दिसत आहे.
सचिनने शूट केला व्हिडिओ
रैना-पठाणचे गाणे आणि युवराजचा डान्स हा व्हिडिओ खुद्द सचिनने शूट केला आहे. युवराजने हा व्हिडिओ शेयर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, ‘दोन दिग्गज गायक इरफान पठाण, सुरेश रैना आणि निश्चितच दिग्गजांचे दिग्गज सचिन तेंडूलकर, मुनाफ पटेल, मनप्रीत गोनी, प्रज्ञान ओझा यांच्यासोबत मौजमजा करताना.’
Having fun with two legendary singers 🎤 @IrfanPathan @ImRaina 🎶 and of course the legend of legends @sachin_rt 👑 @munafpa99881129 @ManpreetGony @pragyanojha #roadsafetyworldseries #indialegends pic.twitter.com/wjP31UcYVZ
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) September 12, 2022
This is our team 🇮🇳, one family. Lots of love and lots of fun ❤️🏏 Don’t miss Yuvi PA’s entry 😉😜@sachin_rt @YUVSTRONG12 @IrfanPathan @pragyanojha @munafpa99881129 pic.twitter.com/iGhlhaAlk4
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) September 13, 2022
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचे स्वरूप
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचा हा दुसरा हंगाम आहे. यामध्ये तेंडूलकर, युवराज, इरफान, युसूफ पठाण, हरभजन सिंग या दिग्गजांचा समावेश आहे. या स्पर्धेतील सामने कानपूर, इंदोर, देहराडून आणि रायपूर येथे खेळले जाणार आहे. या स्पर्धेत भारताबरोबर न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, श्रीलंका, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या आठ संघांचा समावेश आहे. या स्पर्धेत प्रत्येक संघ 5 सामने खेळणार आहेत. तर गतविजेत्या इंडियाने पहिला सामना जिंकला असून दुसरा सामना 14 सप्टेंबरला खेळणार आहे. हा सामना ग्रीनपार्क स्टेडियम, कानपूर येथे वेस्ट इंडिज विरुद्ध होणार आहे. हा सामना भारताच्या प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्शदीपच्या निवडीनंतर आईने दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “माझ्या मुलाने या वयात…”
अबब! रोहितच्या अंडर विश्वचषकात खेळणार 5 कॅप्टन, विराटसह पाहा कोण आहेत ‘ते’ चार
क्रिकेटर अर्जुनने महिला क्रिकेटर वेदा कृष्णमूर्तीला केले फिल्मी स्टाईल प्रपोज