---Advertisement---

विंडीजच्या या क्रिकेटपटूला पंजाबी बोलताना पाहून युवराजलाही आवरले नाही हसू, पहा व्हिडिओ

On: मंगळवार, नोव्हेंबर 19, 2019 7:33 PM
---Advertisement---

भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने (Yuvraj Singh) आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि बीसीसीआयच्या सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून काही महिन्यांपूर्वी निवृत्ती घेतली आहे. असे असले तरी तो जगभरातील विविध क्रिकेट लीगमध्ये सहभागी होताना दिसून येत आहे.

तो सध्या मराठा अरबियन्स संघासाठी अबू धाबी (Abu Dhabi) टी10 (T10) लीगमध्ये खेळत आहे. या स्पर्धेदरम्यान तो अन्य खेळाडूंबरोबर मस्ती करतानाही दिसला आहे. नुकताच युवराजने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की युवराज वेस्ट इंडीजचा फलंदाज चॅडविक वॉल्टनशी (Chadwick Walton) पंजाबी भाषेत छोटा संवाद साधत आहे. वॉल्टन युवराजसारखेच पंजाबी बोलण्याचा प्रयत्न करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. वॉल्टनचे पंजाबी बोलणे ऐकून युवराजलाही हसू आवरता आले नाही.

युवराजने या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की ‘चॅडविक वॉल्टन, मस्त पंजाबी. चल यार चलिए.’

https://twitter.com/YUVSTRONG12/status/1196529450659266562

युवराजने आतापर्यंत टी10 स्पर्धेत दोन सामने खेळले आहेत. पण यात तो चांगली कामगिरी करण्यात यशस्वी झाला नाही. टी10 लीगमध्ये पदार्पण करताना तो 6 धावा काढून बाद झाला आणि त्यानंतर रविवारी (17 नोव्हेंबर) कलंदर संघाच्या विरोधात खेळताना तो 14 धावांवर बाद झाला.

कलंदर विरुद्धच्या सामन्यात युवराजने बाद होण्याआधी सुलतान अहमदच्या गोलंदाजीवर सलग दोन षटकार ठोकले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---