आयपीएल 2019 चा लिलाव जयपूरमध्ये आज(18 डिसेंबर) सुरु आहे. या लिलावात जवळजवळ सर्वच संघांनी युवा खेळाडूंवर बोली लावण्याला पसंती दिली आहे.
त्यामुळे पहिल्या फेरीत अनेक दिग्गज आणि अनुभवी खेळाडूंना कोणत्याच संघानी संघात घेण्यात नापसंती दाखवली होती. यामध्ये भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगचाही समावेश आहे.
युवराजला आयपीएल लिलावात कोणत्याच संघाने पहिल्या फेरीत सामील करुन घेतले नव्हते. पण त्याला दुसऱ्या फेरीत मुंबई इंडियन्स संघाने संघात घेतले आहे.
मुंबईने युवराजला त्याच्या मुळ किंमतीत म्हणजेच 1 कोटी रुपयात संघात घेतले आहे. युवराज मागील वर्षी वर्षीही किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळला आहे.
युवराजचा हा आयपीएलमधील दिल्ली, पंजाब, पुणे, बेंगलोर आणि हैद्राबाद या संघांकडून खेळला आहे.
.@YUVSTRONG12 is sold to @mipaltan for INR 100 lacs.
— IndianPremierLeague (@IPL) December 18, 2018
युवराजने आत्तापर्यंत 128 सामने आयपीएलमध्ये खेळले असून यात 2652 धावा आणि 36 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–भाऊ तुमच आॅरेंज आर्मीत स्वागत, राशिदने केलं या खेळाडूचं खास स्वागत
–चेन्नई एवढा तगडा संघ परंतु आतापर्यंत केलाय एकच खेळाडू केलाय खरेदी
–मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आतापर्यंत हे ३ मोठे खेळाडू