भारतीय संघ फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात मर्यादीत षटकांची मालिका खेळणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज संघात ३ सामन्यांची एकदिवसीय आणि ३ सामन्यांची टी२० मालिका होणार असून या मालिकांसाठी भारताचे संघ जाहीर झाले आहेत. दरम्यान, या संघांबद्दल भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने मत व्यक्त केले आहे. युवराज सिंगने भारतीय संघातील अशा ४ खेळाडूंची नावे सांगितली आहेत, त्यांना संघात ठेवून चांगला निर्णय घेतला आहे.
साल २००७ च्या टी२० विश्वचषकात ६ चेंडूत ६ षटकार मारण्याचा विश्वविक्रम ज्याच्या नावी आहे तो भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंग (yuvraj singh) याने भारतीय संघातील ४ सर्वाधिक पात्र असणाऱ्या खेळाडूंची नावे ट्वीट करत सांगितली आहेत. या ट्विटमध्ये त्याने फिरकीपटू कुलदीप यादव, अष्टपैलू वाॅशिंग्टन सुंदर, मधल्या फळीतील फलंदाज दीपक हुड्डा आणि सलामीवीर ऋतुराज गायकवाड यांचे नाव घेत शुभेच्छा देल्या आहेत.
युवराज सिंग म्हणाला की, ‘कुलदीप यादव, वाॅशिंग्टन सुंदर, दीपक हुड्डा आणि ऋतुराज गायकवाड यांना संघात पाहुन आनंद झाला. ते सर्व संघात निवडी योग्य आहेत.’
Nice to see @imkuldeep18 @Sundarwashi5 @Deepakhooda54 and ruturajs name in the squad much deserved ! @BCCI
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) January 27, 2022
गतवर्षी श्रीलंकेत भारताकडून खेळणारा कुलदीप यादव आता गुडघ्याच्या दुखापतीतून साावरला आहे. तो पुन्हा युजवेंद्र चहलसोबत खेळताना दिसणार आहे. मधल्या फळीत वेगवान धावा करू शकणाऱ्या आणि सहाव्या गोलंदाजाची भूमिका बजवणाऱ्या दीपक हुड्डाला भारताच्या एकदिवसीय संघात पहिल्यांदाच निवडले आहे.
आर अश्विनपूर्वी वाॅशिंग्टन सुंदर हा संघाचा भाग होता. पण दुखापतीमुळे तो संघातून बाहेर होता. आता पुन्हा एकदा निवडकर्त्यांनी या फिरकीपटूला संधी दिली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठीही त्याची संघात निवड झाली होती, मात्र कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्याला संघाबाहेर व्हावे लागले होते. ऋतुराज गायकवाडही संघात आहे, पण रोहित शर्माच्या संघात पुनरागमन झाल्यामुळे त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
वेस्ट इंडिज संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. ६ फेब्रुवारीपासुन भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि तीन सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी२० मालिका खेळली जाणार आहे. या दोन संघांमधील एकदिवसीय मालिका ६ फेब्रुवारीला सुरु होणार आहे. हे सामने अहमदाबाद येथे पार पडणार आहेत. तसेच टी२० मालिका १६ फेब्रुवारीपासुन सुरु होणार आहे. हे सामने कोलकाता येथे खेळले जाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या् –
वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडेत रिषभच्या खांद्यावर मोठी जबाबदारी? बीसीसीआयकडून आली माहिती
युगांडाच्या गोलंदाजाची अंडर-१९ विश्वचषकात मंकडिंग अन् पेटला विवाद, युवराज-शम्सी आमने सामने
व्हिडिओ पाहा – २०१९ विश्वचषक सेमीफायनलनंतर काय घडलं होतं भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये