फेब्रुवारी महिन्यात आयपीएल २०२२ (ipl 2022) साठी मेगा लिलाव (mega auction) आयोजित केला गेला आहे. मागच्या वर्षी सर्व आयपीएल फ्रेंचायझींनी संघातील मोठ्या खेळाडूंना रिलिज केले होते. अशात मेगा लिलावात दिग्गज खेळाडूही सहभागी झालेले दिसतील. पण या दिग्गजांमध्ये काही युवा खेळाडूही आहेत, ज्यांच्यावर मोठी बोली लागेल. प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी अशाच दोन भारतीय क्रिकेटपटूंची नावे सांगितली आहेत, ज्यांच्यावर मेगा लिलावात मोठी बोली लागेल.
मेगा लिलावाच्या पार्श्वभूमीवर सर्व आयपीएल फ्रेंचायझी तयारीला लागल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात १२ आणि १३ तारखेला हा लिलाव होईल. प्रत्येक फ्रेंचायझीने त्याचे काही खेळाडू रिटेन केले आहेत. आता त्यांच्याकडे उरलेल्या पैशांच्या हिशोबाने खेळाडूंवर बोली लावण्याचे नियोजन सध्या संघ करत आहेत. अशात हर्षा भोगलेंनी दोन युवा खेळाडूंची नावे सांगितले आहेत. भोगलेंच्या मते, या खेळाडूंवर सर्वात मोठी बोली लागण्याची अपेक्षा आहे.
भोगलेंच्या मते, भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) आणि शाहरुख खान (Shahrukh Khan) यांच्यावर फ्रेंचायझींकडून मोठी बोली लागेल. यो दोघांना विकत घेण्यासाठी संघांमध्ये स्पर्धा असेल. भोगले म्हणाले की, “ईशान तुम्हाला प्रत्येक विभागात उपयोगी पडतो. तो भारतीय आहे, डावखुरा फलंदाज आहे, यष्टीरक्षक आहे, वरच्या फळीत फलंदाजी करू शकतो. मी शाहरुख खानलाही यावेळी चांगले प्रदर्शन करताना पाहत आहे. त्याच्या खेळीत एक चमक दिसते. तो त्याच्या प्रदर्शनाने युसुफ पठाणची आठवण करून देतो.”
दरम्यान, मुंबई इंडियन्सने आयपीएल २०१८ च्या मेगा लिलावात ईशान किशनला ६ करोड २० लाख रुपयांमध्ये विकत घेतले होते. त्याने मुंबई इंडियन्ससाठी नेहमीच चांगले प्रदर्शन केले आहे. त्याच प्रदर्शनाच्या जोरावर त्याने भारतीय संघातही स्वतःचे स्थान बनवले. त्याचे आतापर्यंतच्या आयपीएलमधील प्रदर्शन पाहता मेगा लिलावात त्याच्यावर मोठी बोली लागेल यात शंका नाही.
शाहरुख खानचा विचार केला तर, त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडू संघासाठी खेळताना अप्रतिम प्रदर्शन केले आहे. त्याची फलंदाजी पाहून अनेक दिग्गज प्रभावित झाले आहेत. मागच्या वर्षीच्या आयपीएल लिलावात शाहरुखला पंजाब किंग्जने ५ करोड रुपयांमध्ये विकत घेतले होते. त्यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेली उत्कृष्ट फलंदाजी पाहून फ्रेंचायझी नक्कीच त्याच्यावर अधिक रक्कम खर्च करू शकतात.
महत्वाच्या बातम्या –
‘लखनऊ संघाचे माझ्यासाठी किती बजेट?’, शार्दुलने विचारलेल्या प्रश्नावर केएल राहुलने दिले ‘हे’ उत्तर
व्हिडिओ पाहा –






