---Advertisement---

U19 WC: कर्णधार-उपकर्णधार झाले, आता क्वार्टरफायनल सामन्यापूर्वी भारताचा प्रभारी कर्णधार कोरोना पॉझिटिव्ह

On: शनिवार, जानेवारी 29, 2022 12:43 PM
Indian-U19-Team
---Advertisement---

कॅरेबियन बेटांवर आयोजित केलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक (U19 World Cup) स्पर्धेत भारतीय संघाने आत्तापर्यंत चांगली कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना बांगलादेशविरुद्ध शनिवारी (२९ जानेवारी) होणार आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वी भारतासाठी आनंदाची बातमी आली आहे. पण त्याचबरोबर एक धक्काही बसला आहे. 

साखळी फेरीतील सामने सुरू असताना भारतीय संघाचा कर्णधार यश धूलसह ५ खेळाडू कोरोना संक्रमित आढळले होते. त्यामुळे हे खेळाडू क्वारंटाईन होते. मात्र, आता या खेळाडूंचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे, हे खेळाडू उपांत्यपूर्व सामन्यासाठी उपलब्ध असतील.

पण, असे असले तरी धक्का देणारी बातमी अशी की, एकीकडे यश धूलसह पाचही खेळाडू संघात परतले आहेत, तर प्रभारी कर्णधारपद भूषवलेला निशांत सिंधू कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. माध्यमांतील वृत्तानुसार युगांडाबरोबरील साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यानंतर सिंधूची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे तो बाद फेरीतून बाहेर झाला आहे. त्याच्याऐवजी डाव्य हाताचा फिरकीपटू अनिश्वर गौतमला संघात बदली खेळाडू म्हणून सामील करण्यात आले आहे.

सिंधूने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. त्याने पहिल्या तीन सामन्यात ७८ धावा करण्याबरोबरच ४ विकेट्सही घेतल्या होत्या.

यापूर्वी साखळी फेरी सुरू असताना कर्णधार यश धूल (Yash Dhull), उपकर्णधार शेख रशीद, आराध्य यादव, वासु वत्स आणि सिद्धार्थ यादव या भारतीय खेळाडूंचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

अधिक वाचा – भारताला पाचवे अंडर-१९ विश्वविजेतेपद मिळवून देण्याची जबाबदारी यश धूलच्या खांद्यावर; जाणून घ्या आजपर्यंतचा प्रवास

बांगलादेशविरुद्ध रंगणार उपांत्यपूर्व सामना 
शनिवारी भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध कूलिज क्रिकेट ग्राउंड, अँटिग्वा येथे उपांत्यपूर्व सामना खेळणार आहे. हा सामना जो जिंकेल तो संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल. यापूर्वी या दोन संघात २०२० साली झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात अंतिम सामना झाला होता. त्यावेळी बांगलादेशने विजय मिळवत विजेतेपद पटकावले होते.

व्हिडिओ पाहा – २०१९ विश्वचषक सेमीफायनलनंतर काय घडलं होतं भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये

असा आहे भारतीय संघ
यश धुल (कर्णधार), दिनेश बाना (यष्टीरक्षक), हरनूर सिंग, अंगक्रिश रघुवंशी, शेख रशीद, आराध्य यादव, निशांत सिंधू, कौशल तांबे, रवी कुमार, सिद्धार्थ यादव, राजवर्धन हंगरगेकर, मानव पारेख, अनिश्वर गौतम, राज बावा, वासू , विकी ओस्तवाल, गरव सांगवान.

महत्त्वाच्या बातम्या – 

U19 WC: भारत – बांगलादेश संघात रंगणार उपांत्यपूर्व सामन्याचा थरार; केव्हा आणि कधी होणार सामना, घ्या जाणून

विराटच्या नेतृत्त्वातील आरसीबीचा भाग राहिलेल्या क्रिकेटरचा दिल्ली पोलिसांविरुद्ध मारहाणीचा गंभीर आरोप, वाचा सविस्तर

फ्लॅशबॅक! १६ वर्षांपूर्वी इरफान पठाणने पाकिस्तान विरुद्ध घेतली होती हॅट्रिक, पाहा व्हिडिओ

काय घडलं होतं भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये । World Cup Semi Final 2019

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---