---Advertisement---

अश्विन अण्णांनाही अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ने लावले वेड, बॅट घेऊन केली ‘श्रीवल्ली’ची हुक स्टेप- Video

On: शनिवार, जानेवारी 29, 2022 3:47 PM
R-Ashwin-Srivalli-Step
---Advertisement---

भारतात हिंदी सिनेसृष्टीबरोबरच दाक्षिणात्य चित्रपटांचेही खूप क्रेज आहे. काही महिन्यांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंधाना यांचा पुष्पा चित्रपट (Pushpa Movie) रिलीज झाला आहे. हिंदी भाषेतही डब झालेल्या या सिनेमाने आणि त्यातील गाण्यांनी सर्वांना वेड लावले आहे. जिकडेतिकडे या सिनेमातील डायलॉग्ज आणि गाणी वाजवली जात आहेत. अगदी क्रिकेट क्षेत्रही याला अपवाद नाही. आतापर्यंत बऱ्याचशा क्रिकेटपटूंनी पुष्पा सिनेमातील हूक स्टेप्सची नक्कल करत मैदानात जल्लोष साजरा केला आहे. तसेच अनेकांनी त्यातील गाण्यांवर डान्सही केला आहे. 

आता भारताचा फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) यानेही पुष्पा सिनेमातील श्रीवल्ली (Srivalli Song) गाण्याची हुक स्टेप (Srivalli Hook Step) केली आहे. त्याचा हा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर (Ashwin Danced On Srivalli) केला आहे. 

विशेष म्हणजे, अश्विनने बॅटचा वापर करत ही स्टेप केली आहे. हातात बॅट घेऊन शॉट मारत असल्याची कृती करत तो श्रीवल्लीची हुक स्टेप करताना दिसतो आहे. या व्हिडिओत श्रीनिवास राजामणीही त्याला ही स्टेप करण्यासाठी साथ देतो आहे. अश्विनच्या या व्हिडिओला लाखोंच्या संख्येत लाईक्स आल्या आहेत.

https://www.instagram.com/reel/CZTdbj6IMsa/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान येत्या फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर (West Indies Tour Of India) येणार आहे. या दौऱ्यावर उभय संघांना ३ सामन्यांची वनडे आणि ३ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. या मालिकांसाठी भारताच्या १८ सदस्यीय संघांत अनुभवी फिरकीपटू अश्विन (R Ashwin) याला जागा दिली गेलेली नाही.

टाईम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिका खेळताना अश्विनच्या मनगट आणि पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. या दुखापतीतून बरे व्हायला त्याला वेळ लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊनमध्ये झालेल्या तिसऱ्या वनडेमध्ये अश्विनच्या पायाचा घोटा वाकडा झाला आणि तो मनगटावर पडला, यात त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे कदाचित वेस्ट इंडिजविरुद्ध त्याची निवड झाली नसावी. तसेच त्याने वनडे मालिकेत फारसा प्रभाव पाडला नव्हता, हेही कारण असावे.

याबरोबरच दुखापत असतानाही अश्विनला वेस्ट इंडिजविरुद्ध खेळवणे, योग्य ठरणार नाही. यामुळे निवडकर्त्यांनी त्याला विश्रांती देण्याच्या निर्णयास प्राधान्य दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘लखनऊ संघाचे माझ्यासाठी किती बजेट?’, शार्दुलने विचारलेल्या प्रश्नावर केएल राहुलने दिले ‘हे’ उत्तर

अन् स्टिव्ह स्मिथने स्वत:वरच मीम बनवत नामकरणही केले, ‘त्या’ इंस्टाग्राम पोस्टमागचा हेतू तरी काय?

रोहित-द्रविड जोडीवर सचिन तेंडुलकरने व्यक्त केला विश्वास; म्हणाला, ‘ते दोघे भारताला…’

हेही पाहा-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---