---Advertisement---

…आणि युवराजचे ते स्वप्न अधूरेच राहिले!

---Advertisement---

भारताचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. युवराजने 3 ऑक्टोबर 2000 ला चॅम्पियन्स ट्रॉफीमधून केनिया विरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

त्यानंतर त्याने 19 वर्षांच्या त्याच्या कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले. तसेच अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भारताला विजय मिळवून देण्यात त्याने मोलाचा वाटाही उचलला.

यातील 2007 च्या पहिल्या वहिल्या टी20 विश्वचषकातील त्याचे 6 चेंडूतील 6 षटकार, ऑस्ट्रेलिया विरुद्ध केलेली तुफानी 30 चेंडूतील 70 धावांची खेळी, 2011 च्या विश्वचषकातील त्याची अफलातून अष्टपैलू कामगिरी, 2002 च्या नेटवेस्ट मालिकेत इंग्लंड विरुद्ध मोहम्मद कैफबरोबर केलेली शतकी भागिदारी, असे अनेक क्षण चाहत्यांच्या कायम लक्षात राहतील.

युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 304 वनडे, 40 कसोटी आणि 58 टी20 असे मिळून एकूण 402 सामने खेळले. यामध्ये मिळून त्याने 11778 धावा केल्या. मात्र युवराजचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे कर्णधार होण्याचे स्वप्न मात्र अपूर्ण राहिले.

300 पेक्षा अधिक वनडे आणि 400 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधारपद न सांभाळलेला तो केवळ दुसरा क्रिकेटपटू आहे.

याआधी श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज मुथय्य मुरलीधरन असा एक क्रिकेटपटू आहे. ज्याने 300 पेक्षा अधिक वनडे आणि 400 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळूनही कधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्त्व केले नाही. मुरलीधरनने त्याच्या कारकिर्दीत 350 वनडे सामने खेळले. तसेच 495 आंतरराष्ट्रीय सामने खेळले.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

निवृत्तीपेक्षाही मोठी बातमी, युवराज सिंगने घेतला मोठा निर्णय

-युवराजबरोबर पदार्पण केलेले ४ खेळाडू आजही खेळतात क्रिकेट

अशी आहे युवराजची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment