भारताचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग आज (12 डिसेंबर) त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. युवराजने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेकदा चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी दिली आहे. युवराजने 3 ऑक्टोबर 2000 ला चॅम्पियन्स ट्रॉफीमधून केनिया विरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने 19 वर्षांच्या त्याच्या कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले. तसेच अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भारताला विजय मिळवून देण्यात त्याने मोलाचा वाटाही उचलला. 2019 मध्ये अखेर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली.
त्याच्या कारकिर्दीतील 2007 च्या पहिल्या वहिल्या टी20 विश्वचषकातील त्याचे 6 चेंडूतील 6 षटकार, ऑस्ट्रेलिया विरुद्ध केलेली तुफानी 30 चेंडूतील 70 धावांची खेळी, 2011 च्या विश्वचषकातील त्याची अफलातून अष्टपैलू कामगिरी, 2002 च्या नेटवेस्ट मालिकेत इंग्लंड विरुद्ध मोहम्मद कैफबरोबर केलेली शतकी भागिदारी, असे अनेक क्षण चाहत्यांच्या कायम लक्षात राहतील.
युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 304 वनडे, 40 कसोटी आणि 58 टी20 असे मिळून एकूण 402 सामने खेळले. यामध्ये मिळून त्याने 11778 धावा केल्या. मात्र युवराजचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे कर्णधार होण्याचे स्वप्न मात्र अपूर्ण राहिले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 पेक्षा अधिक वनडे आणि 400 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळूनही कर्णधारपद न सांभाळलेला तो केवळ दुसरा क्रिकेटपटू आहे.
संपुर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत कधीही कर्णधार न झालेले आणि ४०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले खेळाडू
४९५- मुथय्या मुरलीधरन
४०२- युवराज सिंग #म #मराठी #YuvrajSingh @Mazi_Marathi @Maha_Sports #CWC19 pic.twitter.com/8mcFs0Falp https://t.co/fLoTNX0Nhu— Sharad Bodage (@SharadBodage) June 10, 2019
याआधी श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज मुथय्या मुरलीधरन असा एक क्रिकेटपटू आहे. ज्याने 300 पेक्षा अधिक वनडे आणि 400 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळूनही कधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्त्व केले नाही. मुरलीधरनने त्याच्या कारकिर्दीत 350 वनडे सामने खेळले. तसेच 495 आंतरराष्ट्रीय सामने खेळले.
महत्त्वाच्या बातम्या –
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ३: दादा गुडनाईट बोलून निघून गेला, परंतु युवराज मात्र पूरता घाबरला
विश्वचषक जिंकून देण्यात युवराजची भूमिका सर्वात महत्त्वाची; पाहा आकडे काय सांगतात?
‘एव्हरयंग’ ताहिर श्रीलंकेत करतोय मन जिंकणार काम; स्वत: केला खुलासा