Rohit Sharma-Hardik Pandya Controversy: आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याने येथे रोहित शर्मा याची जागा घेतली. रोहित आता हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. हार्दिक केवळ कर्णधार बनण्याच्या अटीवर मुंबई इंडियन्समध्ये आला होता. जेव्हा त्याची गुजरात टायटन्स संघामधून मुंबई फ्रँचायझीमध्ये बदली करण्यात आली आणि त्याला कर्णधार बनवण्यात आले तेव्हा रोहित शर्माच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर हार्दिकला खूप ट्रोल केले होता. हार्दिकला हिटमॅनऐवजी कर्णधार बनवणे चाहत्यांना आवडले नाही.
यानंतर टी20 विश्वचषकातही हार्दिक पंड्या याची कर्णधार होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. याचा अर्थ भारतीय संघातही रोहित शर्मा याला हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळावे लागू शकते. हार्दिक पंड्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत असे. रोहितच्या नेतृत्वाखाली तो एक मजबूत अष्टपैलू खेळाडू बनला आहे. दोघांमध्ये चांगले बॉन्डिंग झाले आहे पण आता ही केमिस्ट्री अशीच राहणार का? गेल्या काही आठवड्यांपासून ही चर्चा सुरू आहे. याबाबत भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंग याला विचारण्यात आले असता, त्याने काय उत्तर दिले, पाहा… (yuvraj singh on potential ego clash between rohit sharma and hardik pandya)
युवराज म्हणाला, “जेव्हा खेळाडू एकत्र क्रिकेट खेळतात तेव्हा या सर्व गोष्टी घडतात. खेळाडूंच्या एकमेकांविरुद्ध काही तक्रारी असतील तर त्यांनी नक्की बसून चर्चा करावी. हार्दिक जेव्हा मुंबई इंडियन्सकडून खेळला तेव्हा रोहितने त्याच्यातील सर्वोत्तम कामगिरी काढून घेतली. हार्दिकच्या कामाचा बोजा पाहून रोहित त्याला अतिशय हुशारीने गोलंदाजी करायला लावायचा. बरं, मला काही प्रॉब्लेम दिसत नाही पण जर काही असेल तर आपण दोघांनी त्याबद्दल बोलायला हवं.”
युवराज पुढे म्हणाला, “जेव्हाही तुम्ही देशासाठी खेळता तेव्हा तुमचे प्राधान्य सर्व काही बाजूला ठेवून शंभर टक्के देण्यास असते. हे दोघेही प्रोफेशनल आहेत. जर त्यांच्यात काही वाद असेल तर त्यांनी तो बाजूला ठेवावा आणि देशासाठी शंभर टक्के द्यावे.”
यावेळी युवराजने रोहित शर्माचेही खूप कौतुक केले. तो म्हणाला, “मी म्हणू शकतो की, रोहित एक अद्भुत कर्णधार आहे. त्याच्या खात्यात 5 आयपीएल ट्रॉफी आहेत. त्याने आम्हाला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेले. तो आयपीएल आणि भारतातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे.” (Is there an ego clash between Rohit and Hardik? Check out Yuvraj Singh’s reply)
हेही वाचा
IND vs AFG: इंदोरमध्ये आज भारत-अफगाणिस्तान भिडणार, पाहा कशी असेल खेळपट्टी आणि संघांची संभावीत प्लेइंग-11
‘आता कोणी रोखून दाखवा’, भारतीय संघात निवड झालेल्या युवा फलंदाजाबद्दल मित्राची लक्षवेधी पोस्ट