भारतीय संघाला मागील अनेक महिन्यांपासून मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीची समस्या जाणवत आहे. भारताने या क्रमांकावर अनेक खेळाडूंना संधी दिली आहे. 2019 विश्वचषकातही या क्रमांकावर केएल राहुल, रिषभ पंत, विजय शंकर आणि दिनेश कार्तिक हे फलंदाज खेळले.
त्यामुळे सातत्याने चौथ्या क्रमांकावर वेगवेगळे फलंदाज खेळवणे हेच 2019 विश्वचषक न जिंकण्याचे कारण असल्याचे भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने म्हटले आहे.
युवराजने आजतकशी बोलताना म्हटले आहे की ‘तूम्ही चांगले कौशल्य असलेला खेळाडू ओळखून त्याला पाठिंबा दिला पाहिजे. उदाहरणार्थ 2003 च्या विश्वचषकात मी आणि मोहम्मद कैफ. न्यूझीलंडमध्ये त्यावेळी जवळजवळ सर्व खेळाडू अपयशी ठरले होते. पण तरीही साधारण तोच संघ 2003 विश्वचषकात खेळला.’
‘2019 विश्वचषकाचा विचार केला तर सुरुवातीला तर मला वगळण्यात आले होते. मग मनिष पांडेला संधी दिली. त्यानंतर एक-दोन आणखी खेळाडू खेळले. केएल राहुललाही संधी मिळाली. सुरेश रैनाने संघात पुनरागमन केले. पण नंतर अंबाती रायडूला संघात घेतले. तो 8-9 महिने खेळला. त्याने न्यूझीलंडमध्ये 90 धावांची महत्त्वाची खेळीही केली.’
‘पण 2019 विश्वचषकाआधी आपण ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभूत झालो. रायडूसाठी ही मालिका खराब ठरली आणि त्यानंतर अचानक विजय शंकर संघात आला. निवड समीतीने चौथ्या क्रमांकाचे महत्त्व समजून घ्यायला हवे. विशेषत: इंग्लंडमध्ये.’
‘विजय शंकर आणि रिषभ पंतकडे अनुभव नव्हता. दिनेश कार्तिक अनुभवी आहे पण तो बऱ्याच सामन्यांसाठी बाहेर बसला आणि अचानक उपांत्य सामन्यासाठी फलंदाजीला गेला. त्यामुळे मला खरंच यामागे काय विचार होता हे कळाले नाही.’
‘मला वाटते भारताने 2019 विश्वचषक न जिंकण्याचे हेच मुख्य कारण आहे. माझ्या मते भारत आणि इंग्लंड हे अंतिम सामना खेळण्यासाठी सर्वोत्तम संघ होते.’
त्याचबरोबर 2019 विश्वचषकातील उपांत्य सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध 240 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचे पहिले 3 फलंदाज 10 चेंडूंच्या आत बाद झाले होते. असे असतानाही अनुभवी एमएस धोनी 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. या निर्णयाचेही आश्चर्य वाटल्याचे युवराजने म्हटले आहे.
भारताला या उपांत्य सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध 18 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले होते.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–रोहित शर्माने कसोटीत ओपनिंग करण्याबद्दल अजिंक्य रहाणे म्हणाला…
–‘रेकॉर्ड ब्रेकर’ परदीप नरवाल काही थांबेना, केले हे खास विश्वविक्रम
–धोनीला ‘त्या’ क्रमांकावर फलंदाजी करताना पाहून आश्चर्य वाटले – युवराज सिंग