मंगळवारी(18 डिसेंबर) आयपीएल 2019 चा लिलाव जयपूर, राजस्थानमध्ये पार पडला. या लिलावात भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगवर पहिल्या फेरीत कोणत्याच संघाने बोली लावली नव्हती. त्याला दुसऱ्या फेरीत शेवटच्या क्षणी मुंबई इंडियन्सने बोली लावत संघात सामील करुन घेतले.
पण या गोष्टीमुळे आश्चर्य वाटले नसल्याचे युवराजने सांगितले आहे. याविषयी मुंबई मिररशी बोलताना युवराज म्हणाला, ‘मला कुठेतरी वाटत होती की यावर्षी मी मुंबई संघात जाईल. खरंतर मी यावर्षी खेळण्यासाठी संधीची वाट पाहत होतो आणि मी आनंदी आहे की ती संधी मिळाली.’
‘आकाश अंबानीने माझ्याबद्दल चांगल्या गोष्टी बोलल्या आहेत आणि माझ्यावर असा विश्वास दाखवल्याने आनंद वाटतो.’
युवराजसाठी 2018 चा आयपीएल मोसम खास ठरला नव्हता. त्याने 2018 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना 8 सामन्यात 65 धावाच केल्या होत्या.
याबद्दल युवराज म्हणाला, ‘मान्य आहे की मागील मोसम खास ठरला नव्हता. पण खरंतर मी 4-5 सामन्यात वेगवेगळ्या जागेवर खेळलो. मला फलंदाजीसाठी एक स्थान दिले नव्हते. यावर्षी मी मला मिळणाऱ्या संधीचा पुरेपूर वापर करेल.’
याबरोबरच युवराजने त्याची कारकिर्द अखेरच्या टप्प्यात आहे, त्यामुळे आयपीएल लिलावात त्याला सुरुवातीला कोणत्याही संघाने पसंती दिली नाही, ही गोष्ट त्याने मान्य केली आहे.
तो म्हणाला, ‘कारण हे योग्य आहे. जर तूम्ही आयपीएलचा संघ लक्षात घेतला तर तूम्ही नक्कीच युवा खेळाडूंचा विचार कराल. आत्ता मी मी माझ्या कारकिर्दीत ज्या टप्प्यात आहे त्याला तूम्ही कारकिर्दीतील अखेरचा टप्पा समजू शकता. त्यामुळे मला आशा होती की शेवटच्या फेरीत मला कोणतातरी संघ मिळेल.’
महत्त्वाच्या बातम्या:
–धोनीने रणजी ट्रॉफी खेळणे म्हणजे युवा खेळाडूची संधी हुकणे!
–भारताचे माजी सलामीवीर फलंदाज झाले भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक