मुंबई । माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) प्राप्त करणारा पहिला खेळाडू आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात युवराजने स्थानिक क्रिकेट आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) यासह खेळाच्या सर्व स्वरूपातून निवृत्तीची घोषणा केली, त्यानंतर बीसीसीआयने त्याला परदेशी लीगमध्ये भाग घेण्यासाठी एनओसी दिली.
निवृत्तीनंतर युवराज ग्लोबल टी20 कॅनडा लीगमध्ये भाग घेणारा पहिला भारतीय ठरला. कॅनेडियन लीगनंतर हा अष्टपैलू खेळाडू अबू धाबीकडे क्रिकेट खेळण्यास गेला. जिथे त्यांने टी 10 लीगमध्ये मराठा अरेबियांचे प्रतिनिधित्व केले.
यावर्षी युवराज अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेईल अशी अपेक्षा होती, पण सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरसच्या साथीमुळे या क्रिकेटपटूला त्याच्या घरीच राहावे लागले. हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना युवराजने आपल्या भविष्यातील योजनांची माहिती दिली. तो म्हणाला, “मला आंतरराष्ट्रीय लीगमध्ये खेळायचे आहे. परंतु महामारीच्या पार्श्वभूमीवर ही लीग पुन्हा कधी सुरू होईल हे मला माहीत नाही.”
युवराजने कारकीर्दीत 40 कसोटी, 304 वनडे सामने आणि 58 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-आयपीएलमध्ये मिळाली नाही संधी आता निवृत्तीनंतर एलपीएल मध्ये खेळणार ‘हा’ भारतीय खेळाडू
-‘शुबमन गिलने कोणालाही शिवी दिली नाही,’ पहा कोण म्हणतंय
-‘हा’ माजी खेळाडू आयपीएलमध्ये कॉमेंट्री करण्यास इच्छुक; बीसीसीआयकडे केली विनंती
ट्रेंडिंग लेख-
-भारताकडून एकही सामना न खेळलेले परंतू आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारे ३ प्रतिभावान क्रिकेटर
-आयपीएल २०२०: ‘या’ ३ कारणांमुळे विराटचा आरसीबी संघ यंदा जिंकू शकतो आयपीएल ट्रॉफी