जून – जूलै महिन्यात पार पडलेल्या 2019 विश्वचषकात(Worldcup 2019) भारतीय संघाला उपांत्य सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध 18 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले होते.
या सामन्यात 240 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचे पहिले 3 फलंदाज 10 चेंडूंच्या आत बाद झाले होते. असे असतानाही भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी (MS Dhoni) 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याच्याआधी दिनेश कार्तिक, रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांना फलंदाजीची संधी मिळाली.
त्यामुळे धोनीने 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याच्या भारतीय संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर अनेकांनी टीका केली होती. याबद्दल आता भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगनेही (Yuvraj Singh) आश्चर्य व्यक्त केले आहे.
2011 विश्वचषकातील मालिकावीर युवराज आजतकशी बोलताना म्हणाला, ‘एमएस धोनीला (2019 विश्वचषकात न्यूझीलंड विरुद्ध) सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेले पाहून मला आश्चर्य वाटले होते.’
‘धोनी अनुभवी असल्याने मला वाटते की त्याने वरच्या क्रमांकावर फलंदाजीला यायला हवे होते. मला माहित नाही संघ व्यवस्थापनाने काय विचार केला होता. पण आता जाऊदे, ते सर्व होऊन गेले आहे.’
त्याचबरोबर युवराजने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीच्या समस्येबद्दलही भारतीय संघ व्यवस्थापनेवर टीका केली आहे. त्याने यावेळी म्हटले की चौथा क्रमांक हा खूप महत्त्वाचा असतो. पण मागील अनेक महिन्यांपासून सातत्याने त्या क्रमांकासाठी विविध खेळाडूंना संधी दिली जात आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–सुरेश रैना म्हणतो, टीम इंडियाकडून ‘या’ क्रमांकावर करु शकतो फलंदाजी
-या मोठ्या कारणामुळे एमएस धोनी टीम इंडियापासून दूर…
-या महिन्यात होणार आयपीएल २०२०चा लिलाव