भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने मोहम्मद कैफबरोबर इंस्टाग्राम लाईव्ह चॅटमार्फत संवाद साधला. यामध्ये युवराजने आपल्या कारकीर्दीतील सर्वात कठीण असणाऱ्या निवृत्तीच्या निर्णयाबद्दल चर्चा केली.
यावेळी त्याने निवृत्ती घेतल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी करणार आहे, ते सांगितले. कैफने (Mohammad Kaif) २०१८मध्ये तर युवराजने जून २०१९मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. या चॅट दरम्यान कैफने युवराजला (Yuvraj Singh) विचारले की, त्याला त्याच्याबरोबर समालोचन करायला आवडेल का? तसेच कॉमेंट्री बॉक्समध्ये बसेल का?
यावर प्रत्युत्तर देताना युवराज हसत हसत म्हणाला की, “कसं आहे ना कैफ तू कॉमेंट्री बॉक्समध्ये लोकांना सांभाळू शकतो. परंतु असे काही लोक आहेत. ज्यांना मी सांभाळू शकत नाही.”
“मी आयसीसीच्या टी२० विश्वचषक, वनडे विश्वचषक किंवा चँपियन्स ट्रॉफी यांसारख्या स्पर्धांमध्ये मला समालोचन (Commentary) करायला आवडेल. कारण मला नाही वाटत की मी पूर्णवेळ समालोचन करू शकेल. मी तितका संयमी नाही. मला हे कठीण वाटते की इतके वर्ष खेळल्यानंतर एखादा व्यक्ती टी.व्ही. समोर बसला आहे आणि क्रिकेटबद्दल बोलत आहे,” असेही समालोचनाबद्दल बोलताना युवराज म्हणाला.
कैफने कोचिंगबद्दल विचारले असता युवराज म्हणाला की, “प्रत्येक व्यक्तीची आपली आवड-निवड असते. मला कोचिंग करायला आवडेल. मला वाटते की, जेव्हा मी लहान मुलांना कोचिंग देईल, तेव्हा समालोचनाच्या तुलनेत मला जास्त आनंद घेता येईल.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-गरीब मुलांच्या मदतीला धावुन आला केएल राहुल, करणार ही मदत
-पुणे वाॅरियर्स व रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळलेले ३ खेळाडू
-५ भारतीय क्रिकेटपटू व त्यांच्या अलिशान गाड्या