भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने गेल्या काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी देखील त्याची लोकप्रियता कमी झाली नाहीये. मैदानावर विस्फोटक फलंदाजी करणारा या फलंदाजाची अजूनही आठवण काढली जाते. तो नेहमीच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो. यासह मजेशीर ट्विट, फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. असाच एक मजेशीर व्हिडिओ त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. जो सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
युवराज सिंग क्रिकेटच्या मैदानावर आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जायचा. आपल्या कारकीर्दीत त्याने अनेक मोठ-मोठे विक्रम देखील केले आहेत. दरम्यान क्रिकेटच्या मैदानावरील हा वाघ, सध्या जंगलातील वाघा सोबत रस्सी खेच करताना दिसून येत आहे.
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये युवराज वाघा सोबत ‘टग ऑफ वॉर’ म्हणजे रस्सी खेच करताना दिसून येत आहे. एकीकडे वाघाने दोरी आपल्या तोंडात पकडली आहे. तर दुसरीकडे युवराजने देखील दोरी आपल्या हातात पकडली आहे आणि या दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. परंतु जंगलचा वाघ कुठे पराभूत होणार ना. खूप वेळ मशागत केल्यानंतर शेवटी युवराज ही दोरी सोडून देतो आणि पराभव स्वीकार करतो. युवराज या शर्यतीत पराभूत झाला असला तरीदेखील त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/tv/CUibj6KK5a4/?utm_medium=copy_link
या व्हिडिओवर कॅप्शन म्हणून त्याने “टायगर विरुद्ध लायगर, खरं तर, आम्हाला निकाल माहित आहे. माझ्या भीतीवर मात करण्याचा हा एक सुंदर अनुभव होता.” युवराज सिंग सध्या यूएईमध्ये आहे. तो सध्या आपल्या मित्रांसोबत मजा मस्ती करताना दिसून येत आहे. ४ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये तो प्राण्यांची भेट घेऊन त्यांना चारा आणि खाद्यपदार्थ चारताना दिसून येत आहे.
तसेच युवराजने पुढे लिहिले की, “फेम पार्क एक सुरक्षित स्थान आहे जिथे प्राण्यांची योग्यरीत्या काळजी घेतली जाते आणि त्यांना सुरक्षित स्थानी ठेवले जाते.”
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नईविरुद्ध तुफानी फलंदाजी केल्यानंतर शिवम दुबे म्हणाला, ‘मी संधीची वाटच पाहत होतो…’
आयपीएल २०२१ मध्ये षटकार मारत संघाला विजय मिळवून देणारे ६ क्रिकेटर
क्रिकेटपटूनंतर टेनिसपटूंची ऑस्ट्रेलियन सरकारवर टीका; ‘हे’ आहे कारण