भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी व दिग्गज अष्टपैलू युवराज सिंग यांनी आपल्या कारकिर्दीतील मोठा काळ एकत्र भारतीय संघासाठी खेळताना घालवला आहे. हे दोघेही मैदानावर नेहमीच एकमेकांची प्रशंसा करताना दिसत. तसेच दोघांनी अनेक अविस्मरणीय खेळ्या करत भारताच्या विजयात योगदान दिले आहे. मात्र, आता युवराजने एका मुलाखतीत बोलताना धोनीविषयी मोठा खुलासा केला आहे.
युवराज सिंग हा धोनीचा वरिष्ठ खेळाडू म्हणून संघात असला तरी, दोघे समवयस्क असल्याने मोठा वेळ एकमेकांसोबत घालवल्याचे दिसते. तसेच सुरुवातीच्या काळात त्यांनी एकत्रितपणे अनेक सामने भारताच्या बाजूने केले होते. वयोगट क्रिकेटपासून हे दोघे एकमेकांविरोधात खेळत.
युवराजने नुकतीच एक मुलाखत दिली त्यामध्ये त्याने अनेक गोष्टींचा उलगडा केला. या मुलाखतीत त्याला त्याच्या व धोनीच्या मैत्रीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तो बोलताना म्हणाला,
“प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर माही आणि माझ्यामध्ये कधीच जवळची मैत्री नव्हती. आम्ही दोघे केवळ क्रिकेटमुळे जवळ होतो. आम्ही एकत्र खेळलो. माझी लाईफस्टाईल पूर्णपणे वेगळी होती. त्यामुळे आम्ही असे क्लोज फ्रेंड कधीच झालो नाही.”
याचवेळी युवराजने हे देखील सांगितले की, “धोनी मैदानावर उतरल्यानंतर शंभर टक्के पेक्षा जास्त योगदान देत असत. तसेच, माझ्या कारकिर्दीच्या अखेरीस त्यानेच मला हे स्पष्टपणे सांगितले होते की, निवड समिती आता तुझ्या नावाचा विचार करत नाही.”
धोनी व युवराज यांनी भारतीय संघासाठी अनेक वर्ष कर्णधार व उपकर्णधार अशी भूमिका बजावली आहे.
(Yuvraj Singh Speaks On His Friendship With MS Dhoni)
हेही वाचा-
CWC 23: भारताला पहिला धक्का! जबरदस्त सुरुवात करून देणाऱ्या रोहितची रबाडाने काढली विकेट
कोलकात्यात टॉस जिंकून रोहितचा दक्षिण आफ्रिकेला धक्का! बावुमासेनेत मोठा बदल, पाहा Playing XI