भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंग याचे भारतीय क्रिकेट वर्तुळात आदराचे स्थान आहे. आपल्या मोठ्या कारकीर्दीत तो अनेक कर्णधारांच्या नेतृत्वात खेळला. 2011 मध्ये कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारातून वाचल्यानंतर त्याने पुनरागमन करत आपल्यातील लढवय्या वृत्ती दाखवून दिली होती. आपल्या कारकिर्दीतील याच महत्त्वाच्या टप्प्याविषयी बोलताना त्याने नुकतीच एक मुलाखत दिली. यावेळी त्याने भारताचे माजी कर्णधार एमएस धोनी व विराट कोहली यांचे कौतुक केले.
युवराजने 2011 मध्ये कॅन्सरचे निदान झाल्यानंतर दोन वर्षांनी 2013 मध्ये भारतीय संघात पुनरागमन केले. त्यानंतर तो आणखी पाच वर्ष भारतीय संघात खेळताना दिसला होता. आपल्या कार्यक्रमातील याच महत्त्वाच्या टप्प्याविषयी बोलताना त्याने एका मुलाखतीत आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला,
“मी भारतीय संघात पुनरागमन केल्यानंतर विराट कोहली एमएस धोनी यांनी मला भरपूर पाठिंबा दिला. जे काही करता येईल ते सर्व या दोघांनी माझ्यासाठी केले. विराटने तो कर्णधार झाल्यानंतर मला अनेकदा संधी दिली. त्याने त्यावेळी मदत केली नसती तर माझे पुनरागमन यशस्वी होऊ शकले नसते.”
युवराज सिंग हा भारताच्या क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम अष्टपैलूपैकी एक आहे. भारताने जिंकलेल्या 2007 टी20 विश्वचषक व 2011 वनडे विश्वचषकात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली. 2007 टी20 विश्वचषकात त्याने महत्त्वाच्या खेळ्या खेळल्या होत्या. तर 2011 वनडे विश्वचषकात तो स्पर्धेचा मानकरी ठरलेला. या विश्वचषकानंतर त्याला कॅन्सरचे निदान झाले होते. तरी देखील त्याने जबरदस्ती इच्छाशक्ती दाखवत पुन्हा भारतीय संघात पुनरागमन केलेले.
(Yuvraj Singh Talk About How Virat Kohli And MS Dhoni Backs Him)
महत्वाच्या बातम्या –
वसीम जाफरच्या प्रश्नांमुळे टीम इंडियाच्या निवडकर्त्यांना फुटेल घाम! संघ निवडीवर माजी सलामीवीर नाखुश
यावेळीही पुजाराच बळीचा बकरा! माजी कर्णधाराने साधला विराट-रोहितवर निशाणा