भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक मोठेमोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्याने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर २००७ सालचा टी२० विश्वचषक आणि २०११ सालचा वनडे विश्वचषक भारताला जिंकून दिला होता. तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठमोठ्या विक्रमांची त्याच्या नावावर नोंद आहे.
परंतु, आंतराष्ट्रीय कारकिर्दीत आपला जलवा दाखवणारा हा क्रिकेटपटू आयपीएलमध्ये हवी तशी कामगिरी करु शकला नव्हता. आयपीएलमध्ये त्याने १३२ सामने खेळत केवळ २४.७७च्या सरासरीने २७५० धावा केल्या आहेत. त्याला आयपीएलमध्ये एक शतकही ठोकता आले नाही. त्यामुळे युवराजला कोणत्याही आयपीएल फ्रंचायझीने जास्त वर्षे आपल्या संघात स्थान दिले नाही.
याच कारणामुळे युवराजने आयपीएलमध्ये तब्बल ६ वेगवेगळ्या संघांकडून क्रिकेट खेळले आहे. यात किंग्स इलेव्हन पंजाब, पुणे वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, सनराइजर्स हैद्राबाद आणि मुंबई इंडियन्स यांचा समावेश आहे.
दरम्यान बोलताना युवराजने एकदा खुलासा केला होता की, त्याला आयपीएलमध्ये कोणत्या संघासोबतचा अनुभव सर्वात वाईट होता आणि त्याला तो संघ का सोडून जावा, असे वाटत होते. स्पोर्ट्स टाईममध्ये दिल्या गेलेल्या वृत्तानुसार, “युवराजचा आयपीएलमधील किंग्स इलेव्हन पंजाब संघासोबतचा अनुभव सर्वात वाईट होता.” Yuvraj Singh Talked About Kings XI Punjab Team Management
“मला किंग्स इलेव्हन पंजाब संघातून निघून जायचे होते. कारण, त्यांचे संघ व्यवस्थापन मला अजिबात पसंत करत नव्हते. मी त्यांना ज्या खेळाडूंना विकत घ्यायला सांगितले होते, त्यांनी त्या खेळाडूंला मी असताना विकत घेतले नव्हते. पण, मी संघातून निघून गेल्यानंतर मात्र त्यांनी त्याच खेळाडूंना आपल्या संघात सामाविष्ट केले. मुळात मला संघ आवडत होता, पण संघ चालवणाऱ्या व्यवस्थापकांमुळे मला संघात राहायचे नव्हते,” असे पुढे बोलताना युवराज सांगितले.
युवराजने किंग्स इलेव्हन पंजाबकडून एकूण ५१ सामने खेळले होते. दरम्यान त्याने ९५९ धावा केल्या होत्या. यात त्याच्या सर्वाधिक नाबाद ५८ धावांचा समावेश होता. शिवाय युवराजने किंग्स इलेव्हन पंजाबचे नेतृत्त्वपद देखील सांभाळले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
फक्त ०.०१७ टक्क्यांनी हुकला जेम्स अँडरसनचा जगातील सर्वात मोठा विक्रम
७० शतके ठोकणाऱ्या विराटसाठी ‘हे’ काम नाही कठीण, घ्या जाणून
आर्थिक संकटाने ग्रस्त असलेल्या अशरफ चाचांच्या मदतीसाठी सचिन आला पुढे
ट्रेंडिंग लेख –
असे ३ खेळाडू ज्यांनी केली आहे १० स्थानांवर फलंदाजी
आयपीएल २०२०: अशी ४ कारणं, ज्यामुळे मुंबई इंडियन्सला मिळू शकते ५ वे आयपीएल विजेतेपद
सेहवाग, गंभीर, विराट अशा दिल्लीकरांचे क्रिकेट करियर घडवणारा राजकारणी नेता