भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने 10 जूनला आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच बीसीसीआयच्या अंतर्गत असणाऱ्या स्पर्धांमधून निवृत्ती घेतली आहे. या निवृत्तीनंतर आता युवराज परदेशी लीग स्पर्धा खेळण्यास सज्ज झाला आहे.
युवराज आता ग्लोबल कॅनडा टी20 लीगमध्ये टोरोंटो नॅशनल्स संघाकडून खेळणार आहे. या संघाने युवराजला स्पर्धेच्या दुसऱ्या मोसमासाठी खेळाडूंच्या ड्राफ्टमधून निवडले आहे. या लीगचा दुसरा मोसम 25 जूलैपासून सुरु होणार असून या स्पर्धेत 22 सामने होणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना 11 ऑगस्टला होणार आहे.
युवराज टोरोंटो नॅशनल्स संघाकडून खेळणार असल्याची माहिती ग्लोबल कॅनडा टी20 लीगच्या ट्विटर हँडेलवरुन देण्यात आली आहे.
For all #YuvrajSingh fans! 🙌#TorontoNationals get @YUVSTRONG12 for #GT2019. pic.twitter.com/jbnsXHWDmb
— GT20 Canada (@GT20Canada) June 20, 2019
युवराजने परदेशी लीग स्पर्धा खेळण्याच्या इच्छेबद्दल निवृत्ती घेण्याच्यावेळीच सांगितले होते. त्याने म्हटले होते की ‘मी आयपीएलचे सामने खेळणार नाही. तसेच मी बीसीसीआयच्या देशांतर्गत स्पर्धा तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. मी परदेशातील टी20स्पर्धा येत्या काळात खेळण्याचा विचार करत आहे.’
बीसीसीआय त्यांच्या अंतर्गत क्रिकेट खेळत असलेल्या क्रिकेटपटूला परदेशी लीग खेळण्याची परवानगी देत नाही. त्यानुसार युवराज बीसीसीआयच्या सर्व क्रिकेटमधून निवृत्त झाल्याने त्याला परदेशी क्रिकेट खेळण्याची परवानगी आहे.
युवराजने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 40 कसोटी सामन्यात 1900 धावा आणि 9 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच वनडेमध्ये 304 सामन्यात खेळताना 8701 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 14 शतकांचा आणि 52 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने वनडेत 111 विकेट्सही घेतल्या आहेत.
त्याचबरोबर युवराजने 58 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 1177 धावा केल्या आहेत आणि 28 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर युवराजने आयपीएलमध्ये 132 सामने खेळताना 2750 धावा केल्या आहेत आणि 36 विकेट्सही घेतल्या आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–बांगलादेश विरुद्ध शतकी खेळी करत डेव्हि़ड वॉर्नरने केली किंग कोहलीच्या विक्रमाची बरोबरी
–भारतीय संघाला पुन्हा धक्का, बुमराहच्या यॉर्करमुळे हा खेळाडू झाला दुखापतग्रस्त
–काय सांगता! टी२० सामन्यात या संघाने केले तब्बल ३१४ धावा, तर दुसरा संघ १० धावांवर सर्वबाद