---Advertisement---

ईशांत शर्माला गोल्फ खेळताना पाहून युवराज सिंगने घेतली त्याची फिरकी; म्हणाला, ‘लंबू जी, जरा…’

---Advertisement---

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग मैदानात असो किंवा मैदानाबाहेर असो तो एखाद्याची मजा घेण्याची कोणत्याही संधी सोडत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर युवराज सिंग सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. त्याचबरोबर तो चाहत्यांसह त्याच्या सहकारी क्रिकेटपटूंना देखील त्याच्या गमतीशीर पद्धतीने ट्रोल करताना दिसून येत असतो.

मागील काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने स्वत:चा गोल्फ खेळत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यानंतर युवराजने या फोटोंवर गमतीशीर कमेंट करत त्याला आपला मौल्यवान सल्ला दिला आहे.

ईशांत शर्मा सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यावर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला. त्यानंतर आता इंग्लंड संघाविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. परंतु, त्या अगोदर भारतीय संघाला तीन आठवड्यांची सुट्टी दिली होती.

याच सुट्टीदरम्यान ईशांतने स्वतःचे काही फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहे. ज्यामध्ये काही फोटोंमध्ये तो गोल्फ खेळताना दिसून येत आहे. ईशांत शर्माने हे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘नजर फक्त चेंडूवर असली पाहिजे, मग तो खेळ कोणताही असो.’

https://www.instagram.com/p/CROltligFNd/

ईशांतने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेले हे फोटो पाहताच युवराजने कमेंट करत लिहिले की, ‘लंबू जी, जरा उघडपणे मार.’

त्याचबरोबर इशांतने युवराजला प्रत्युत्तर देखील दिले. ईशांतने प्रत्युत्तर देताना लिहिले की, ‘युवी पाजी पहिल्यांदाच खेळतोय!! हळूहळू शिकून घेईन!! परंतु, चेंडू खूप दूर गेला होता.’

Screengrab: Instagram/@ishant.sharma29

सध्या इशांत शर्मा भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. 4 ऑगस्टपासून भारतीय संघाला इंग्लंड विरुद्ध नॉटिंघम येथे कसोटी मालिकेचा पहिला सामना खेळायचा आहे. या कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये ईशांतने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येणार आहे.

याअगोदर ईशांत शर्मा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणाऱ्या 11 खेळाडूंचा एक भाग होता. या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाकडून भारतीय संघाला 8 विकेटने पराभव पत्करावा लागला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएल की पीएसएल, कशाची निवड करशील? शोएब अख्तरने दिले भन्नाट उत्तर

युरो चषक २०२१ च्या अंतिम सामन्यात अर्धनग्न चाहत्याचा धुमाकूळ, सुरक्षारक्षकांचा काढला घाम; व्हिडिओ व्हायरल

आज भारत-इंग्लंड संघात रंगणार निर्णायक टी२० सामना; हरमनप्रीत कौरच्या संघाला ‘मोठा’ विक्रम करण्याची संधी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---