भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. त्यानंतर तो आयपीएल स्पर्धेतही खेळताना दिसून आला नाही. त्यामुळे त्याचे चाहते त्याला मैदानात चौकार आणि षटकार मारताना पाहण्यासाठी प्रतिक्षा करत असतात. अशातच चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.
पीटीआयच्या रिपोर्टनुसार,ऑस्ट्रेलियातील मुलग्रेव क्रिकेट क्लबने दावा केला आहे की, ते टी -२० सामन्यांसाठी युवराज सिंग आणि ख्रिस गेल यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर ते ब्रायन लारा आणि एबी डिविलियर्ससारख्या खेळाडूंना देखील जोडण्याच्या प्रयत्नात आहेत.
मुलग्रेव क्लबचे अध्यक्ष मालिन पुलेनयेगम यांनी क्रिकेट डॉट कॉम एयूशी बोलताना म्हटले की, “दिलशानसोबत आमचे बोलणे झाले आहे. सनथ जयसूर्या आणि उपूल थरांगा यांनी देखील होकार दिला आहे. आता आम्ही काही दिग्गज खेळाडूंसोबत संवाद साधत आहोत. आम्ही युवराज सिंग आणि ख्रिस गेलसोबत देखील चर्चा करत आहोत. जवळपास ८० ते ९० टक्के काम झालं आहे. आता खूप बरे वाटत आहे.”
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर, युवराज सिंग मोजक्याच स्पर्धांमध्ये खेळताना दिसून आला आहे. निवृत्तीनंतर त्याने टी-२० कॅनडा लीगमध्ये सहभाग घेतला होता. तसेच टी -१० स्पर्धा खेळला. इतकेच नव्हे तर, अशीही चर्चा होती की तो बिग बॅश लीग स्पर्धेतदेखील सहभाग घेणार होता. परंतु, काही कारणास्तव त्याला या स्पर्धेत सहभागी होता आले नाही.
तसेच युवराजने रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज स्पर्धेत देखील आपली उपस्थिती दर्शविली होती. त्याने सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली इंडिया लिजेंड्सकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली होती. इंडिया लिजेंड्सला रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज स्पर्धेत जेतेपद मिळवून देण्यात युवराजने बहुमूल्य योगदान दिले होते. मध्यंतरित अशा ही बातम्या येत होत्या की, युवराज सिंग पंजाब संघासाठी प्रथम श्रेणी खेळण्यासाठी मैदानात उतरणार हे. परंतु बीसीसीआयने त्याला परवानगी दिली नव्हती, कारण त्याने परदेशी क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. बीसीसीआयच्या नियमानुसार त्यांच्या अंतर्गत खेळणाऱ्या खेळाडूंना भारताबाहेरील लीग स्पर्धा खेळता येत नाही.
महत्वाच्या बातम्या-
ब्रेथवेटच्या ४ षटकारांची स्टोक्सने केली सव्याज परतफेड, व्हिडिओ होतोय व्हायरल
आता रंगणार ग्रास कोर्टवरील थरार! मानाच्या विम्बल्डन ग्रँडस्लॅमसाठी टेनिसपटू सज्ज
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहितसोबत सलामीसाठी गावसकरांचा ‘या’ फलंदाजाला पाठिंबा