भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज युवराज सिंग नेहमीच आपल्या जवळच्या व्यक्तींना आणि आपल्या खेळाडू मित्रांना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसतो. युवराज सिंग ज्यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देतो त्या यादीत सचिन तेंडूलकर, हरभजन सिंग आणि विरेंद्र सेहवाग यांचा समावेश आहे आणि आता त्याने आपला जुना खेळाडू मित्र मोहम्मद कैफ याला विशेष पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. युवराजने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक पोस्ट केली आणि त्याखाली एक मजेशीर कॅप्शन देत मोहम्मद कैफ याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
युवराज सिंग (Yuvraj Singh) याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक जुना फोटो शेअर केला, ज्यात मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) त्याच्या मांडीवर झोपलेला होता. हा फोटो भारतीय संघाच्या सरावाच्या वेळेचा आहे. या फोटोखाली शुभेच्छा देत युवराजने लिहिले की, “आमच्या भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, किती खुश दिसत आहेस माझ्या कुशीत परत येऊन. तुझा पुढचा काळ चांगला येवो. माझ्याकडून तुला खूप सारे प्रेम.” मोहम्मद कैफबदद्ल युवराजचे प्रेम दोघांच्या चाहत्यांना चांगलच आवडत आहे.
https://www.instagram.com/p/ClnMCe0hwB_/?utm_source=ig_web_copy_link
युवराज आणि कैफ एकमेकांसोबत अंडर-19 स्तरापासून खेळत आहेत. कैफच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर-19 विश्वचषक जिंकला होता, ज्यात युवराजने महत्वाची भुमिका निभावली होती. त्याचबरोबर 2002मध्ये नेटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात या दोन्ही खेळाडूंनी धमाकेदार प्रदर्शन करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. फलंदाजी बरोबरच दोन्ही खेळाडूंनी क्षेत्ररक्षणातही चांगलेे योगदान दिले. युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ यांची जोडी क्षेत्ररक्षणासाठी ओळखली जात होती.
मोहम्मद कैफ याने आपला शेवटचा सामना 2006मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. मात्र, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवत्ती 12 वर्षांनी घेतली. त्याने भारतासाठी एकूण 12 कसोटी सामने आणि 125 एकदिवसीय सामने खेळले आहेत.(Yuvraj Singh wished Mohammad Kaif on his birthday in unique way)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहित, विराटबरोबर टीम इंडिया लवकरच बांगलादेशला पोहोचणार; जाणून घ्या संघ आणि वेळापत्रक एकाच क्लिकवर
वेस्ट इंडिजविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा 57 वर्षाचा भन्नाट योगायोग! स्मिथ, लॅब्युशेनने पाडला धावांंचा पाऊस