---Advertisement---

युवराज सिंगवर येणार चित्रपट! वडील योगराज सिंग यांनी दिली प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ

On: मंगळवार, जून 18, 2024 11:06 PM
yuvraj Singh
---Advertisement---

भारताचा माजी दिग्गज खेळाडू युवराज सिंग (Yuvraj Singh) यंदाच्या टी20 विश्वचषकासाठी ब्रँड ॲम्बेसेडर आहे. परंतु त्याच्याविषयी चांगली बातमी समोर येत आहे की, त्याच्या कारकिर्दीबद्दल चित्रपट तयार होत आहे. युवराज सिंग त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीनं नेहमी ओळखला जातो. परंतु आता त्याचं वडील योगराज यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे की, ते युवराज सिंगच्या बायोपिक मध्ये काम करत आहेत.

योगराज सिंग यांनी ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात काम करताना प्रचंड प्रसिद्धी मिळवली. त्यांनी सांगितले की ते ‘द मॅन ऑफ द लाँगेस्ट आवर’ नावाच्या चित्रपटात काम करत आहेत. योगराज यांनी सांगितले की, युवराजनं त्याच्या बायोपिक चित्रपटाला देखील शीर्षक दिले आहे आणि त्याला फक्त अंतिम योजनेवर काम करायचं आहे. त्यांच्या मते, या सिनेमात युवराजचा क्रिकेटमधील प्रवास आणि वडील-मुलगा जोडी यावर भर दिला जाणार आहे. युवराज सिंगनं यापूर्वी सांगितले होते की, त्याला रणबीर कपूरनं त्याची भूमिका साकारलेली पाहण्याची इच्छा आहे.

 

टी20 विश्वचषक 2007च्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात 6 चेंडूत 6 षटकार ठोकून युवराज सिंग सर्वत्र प्रसिद्ध झाला. स्टुअर्ट ब्रॉडच्या चेंडूवर सलग 6 षटकार मारुन त्यानं जगभर खळबळ उडवून दिली. युवराजचा बायोपिक आला तर त्याचं 6 षटकारही नक्कीच दाखवलं जातील. हा तोच सामना होता ज्यात युवराजनं अवघ्या 12 चेंडूत अर्धशतक झळकावून इतिहास रचला होता.

माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग सध्या अमेरिकेमध्ये आहे. जो टी20 विश्वचषक 2024 चे यजमान देश आहे. या विश्वचषकाचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून युवराज सिंगची निवड करण्यात आली आहे. क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी युवराज अनेक अमेरिकन शोमध्येही दिसला आहे. अनेक सामन्यांदरम्यान तो मैदानात चाहत्यांसोबत सेल्फी घेतानाही दिसला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मुख्य प्रशिक्षक पदासाठी पहिल्याच मुलाखतीत गंभीरनं बीसीसीआयसमोर ठेवल्या 5 अटी
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर हारिस रौफनं दिली प्रतिक्रिया
विराट समोर शाहरुख-सलमान फिके; किंग कोहली भारतातील सर्वात माैल्यवान सेलिब्रिटी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---