टी-20 विश्वचषकाच्या मैदानात रविवारी (30 ऑक्टोबर) भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील थरार पाहायला मिळाला. भारतीय संघ या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. भारतीय संघ स्वस्तात सर्वबाद झाल्यानंतर चाहते चांगलेच निराश झाले. पण अशातच फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलचा एक मजेशीर व्हिडिओ समोर आला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चहल या व्हिडिओ मैदानातील पंचांसोबत चेष्ट करताना दिसत आहे.
युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) भारतीय संघाचा एक महत्वाचा भाग आहे. त्याने टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी अनेक सामन्यांमध्ये महत्वाची भूमिका पार पाडली आहे. चहल मैदानातील त्याच्या प्रदर्शनासोबतच मजेशीर स्वभावासाठी देखील ओळखला जातो. त्याचे मजेशीर व्हिडिओ आणि फोटो अनेकदा सोशल मीडियावर समोर येत असतात. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध रविवारी खेळल्या केलेल्या सामन्यात युझवेंद्र चहाल प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी नव्हता. अशात त्याने मोकळ्या वेळेत मैदानातील पंचांना देखील सोडले नाही.
युझवेंद्र चहल यापूर्वी अनेकदा मैदानात सहकारी खेळाडू आणि विरोधी संघातील खेळाडूंची फिरकी घेताना दिसला आहे. पण यावेळी त्याने एक पाऊल पुढे टाकत थेट पंचांसोबत चेष्टा केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने नाणेफेके जिंकून प्रथम फलंदाजी केली. भारताच्या डावातील तिसऱ्या षटकात सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल ड्रिक्स घेण्यासाठी सीमारेषेजवळ आले होते. चहल त्यांच्यासाठी ड्रीक्स घेऊन मैदानात आला होता. यावेळी त्याने पंचांसोबत हा प्रकार केला. चाहलचा हा मजेशीर अंदाज कॅमेऱ्यात कैद झाला आहे आणि सोशल मीडियावर वेगाने व्हायरल देखील होत आहे.
https://twitter.com/Crickket__Video/status/1586692362780016645?s=20&t=trWgP_MMR1hQYLAM7J-8Qw
दरम्यान, उभय संघांतील या व्हिडिओचा एकंदरीच विचार केला, तर भारताने प्रथम फलंदाजी करताना 9 विकेट्सच्या नुकसानावर 133 धावा केल्या. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतासाठी सूर्यकुमार यादव सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. सूर्याने एकूण 40 चेंडू खेळले, ज्यामध्ये 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 68 धावा कुटल्या. भारताने दिलेले 134 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेला दक्षिण आफ्रिका संघाला देखील सुरुवातीचे दोन मोठे झटके मिळाले. त्यांचा सलामीवीर क्विंडन डी कॉक एक धावा करून बाद झाला, तर रायली रुसो शुन्यावर बाद झाला. अर्शदीप सिंगच्या पहिल्या षटकात भारताला या विकेट्स मिळाल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहित अन् विराट फ्लॉप, पण सूर्या ऑन फायर, टी20 विश्वचषकात भारतासाठी ठोकल्या बॅक टू बॅक फिफ्टी
विराटने गाजवला टी20 विश्वचषक, तब्बल 83.41च्या सरासरीने चोपल्यात 1000 धावा