दुबई। 14 व्या एशिया कपमध्ये रविवारी(23 सप्टेंबर) भारताने सुपर फोरच्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध 9 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात भारताचे सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि शिखर धवनने शतके करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
पण याबरोबरच या सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलनेही खास विक्रम केला आहे. त्याने त्याच्या वनडे कारकिर्दीत 50 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.
तसेच वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीतही तो पाचव्या क्रमांकावर आला आहे. त्याने 30 व्या वनडे सामन्यात हा पराक्रम केला आहे.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत माजी गोलंदाज अजित आगरकर अव्वल स्थानावर आहे. त्याने 23 सामन्यात 50 वनडे विकेट्स घेतल्या होत्या.
या यादीत पहिल्या पाच गोलंदाजांमध्ये कुलदीप यादव आणि चहल हे दोनच फिरकी गोलंदाज आहेत. कुलदीपने 24 सामन्यात 50 वनडे विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 विकेट्स घेणारो भारतीय गोलंदाज-
23 सामने – अजित आगरकर
24 सामने – कुलदीप यादव
28 सामने – जसप्रीत बुमराह
29 सामने – मोहम्मद शमी
30 सामने – युजवेंद्र चहल
महत्वाच्या बातम्या –
–म्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल
–शिखर धवनच्या हॅक झालेल्या ट्विटर आकाउंटवरुन राशीद खानला आला मेसेज
–‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा?