गुवाहाटी येथील बारसपारा स्टेडियमवर बुधवारी (5 एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स असा सामना रंगला. आयपीएल इतिहासात प्रथमच गुवाहाटी येथे सामना खेळला गेला. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबचा फलंदाजांनी दमदार फलंदाजी करताना 197 धावा उभ्या केल्या. या सामन्यात केवळ एक बळी मिळवूनही राजस्थानचा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहल याने ऐतिहासिक कामगिरी केली.
Climbing to the 🔝 of an elusive list!@yuzi_chahal is now second in the list of all time leading wicket-takers in the history of #TATAIPL 🫡#RRvPBKS pic.twitter.com/2iWrobm5ud
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2023
बारसपारा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पहिल्या डावात पंजाबच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवले. युवा सलामीवीर प्रभसिमरन गिल याने वादळी अर्धशतक झळकावले. त्यासोबतच कर्णधार शिखर धवन याने देखील नाबाद अर्धशतक पूर्ण केले. राजस्थानसाठी सर्वच गोलंदाज महागडे ठरले. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध च्या पहिल्या सामन्यात चार बळी मिळवणारा चहल यावेळी फारसा यशस्वी ठरला नाही. त्याने 4 षटकात 50 धावा देत जितेश शर्मा याला तंबूचा रस्ता दाखवला.
जितेश याला बाद करताच चहल याच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी मिळवणारा भारतीय गोलंदाज होण्याचा मान जमा झाला. त्याच्या नावे आता 133 सामन्यात 171 बळी जमा आहेत. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 7.62 असा राहिला आहे. चहल याने मागील वर्षी आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी मिळवत पर्पल कॅप देखील जिंकली होती.
आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ड्वेन ब्राव्हो 183 बळींसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर लसिथ मलिंगा 170 बळींसह उभा असून, त्यानंतर भारताच्या अमित मिश्रा (166 बळी) व रविचंद्रन अश्विन (159 बळी) यांचा क्रमांक लागतो.
(Yuzvendra Chahal Becomes Second Most Successful Indian Bowler In IPL History)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गोलंदाजांना शिस्तीत आणण्यासाठी गावसकरांनी सुचविला ‘हा’ उपाय, म्हणाले, “वाईड चेंडू टाकणारे…”
मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स विरुद्ध अहमदनगर पेरियार पँथर्सचा सामना बरोबरीत