---Advertisement---

चहलला खुणावतायेत मोठे विक्रम! बेंगलोरविरुद्ध कमाल करत मलिंगा, बुमराहलाही ठरू शकतो वरचढ

Yuzvendra-Chahal
---Advertisement---

अहमदाबाद। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात शुक्रवारी (२७ मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात क्वालिफायर दोनचा सामना होणार आहे. या सामन्यात जिंकणारा संघ अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सशी दोन हात करेल. दरम्यान, शुक्रवारी होणाऱ्या सामन्यात युजवेंद्र चहल याची कामगिरी कशी होती, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. कारण या सामन्यात त्याला काही खास विक्रम करण्याची संधी असणार आहे.

चहल (Yuzvendra Chahal) सध्या आयपीएल २०२२ हंगामात (IPL 2022) सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने १५ सामन्यांत २६ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे त्याने या सामन्यात २ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या, तर तो एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत इम्रान ताहीर, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांना मागे टाकेल.

क्रिकेट विश्वातील दारूडे क्रिकेटर्स, ज्यांनी घातले आहेत राडे | 5 Alcoholic International Cricketers

सध्या एका आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट्स (Most Wickets in an IPL Season) घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ड्वेन ब्रावो आणि हर्षल पटेल प्रत्येकी ३२ विकेट्ससह अव्वल क्रमांकावर आहेत. तसेच कागिसो रबाडा ३० विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर असून त्याखाली २८ विकेट्ससह लसिथ मलिंगा आणि जेम्स फॉकनर आहेत. जसप्रीत बुमराहने त्यानंतर २७ विकेट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. भुवनेश्वर कुमार आणि इम्रान ताहीर यांच्या नावावरही एका हंगामात २६ विकेट्स घेण्याचा विक्रम आहे.

महत्त्वाची गोष्ट अशी की, राजस्थान रॉयल्स क्वालिफायर दोनचा सामना खेळणार आहे. म्हणजेच, जर ते हा सामना जिंकले, तर ते अंतिम सामन्यात पोहचू शकतात. त्यामुळे जर असे झाले तर चहलला ब्रावो आणि हर्षल पटेलचा ३२ विकेट्सचा विक्रमही मोडता येऊ शकतो. पण त्यासाठी त्याला ७ विकेट्सही अद्याप गरज आहे.

एका आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज 
३२ विकेट्स – हर्षल पटेल, २०२१
३२ विकेट्स – ड्वेन ब्रावो, २०१३
३० विकेट्स – कागिसो रबाडा, २०२०
२८ विकेट्स – लसिथ मलिंगा, २०११
२८ विकेट्स – जेम्स फॉकनर, २०१३
२७ विकेट्स – जसप्रीत बुमराह, २०२०
२६ विकेट्स – भुवनेश्वर कुमार, २०१७
२६ विकेट्स – ड्वेन ब्रावो, २०१५
२६ विकेट्स – इम्रान ताहीर, २०१९
२६ विकेट्स – युजवेंद्र चहल, २०२२*

मलिंगाला मागे टाकण्याची संधी
चहल सध्या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स (Most Wickets in IPL) घेण्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने १२९ सामन्यांत १६५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्यापुढे सध्या १६६ विकेट्सह अमित मिश्रा आहे. तसेच १७० विकेट्सह लसिथ मलिंगा असून या यादीत अव्वल क्रमांकावर ड्वेन ब्रावो आहे. ब्रावोने १८३ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे आता चहलकडे आता अमित मिश्रा आणि लसिथ मलिंगा यांना मागे टाकण्याची संधी आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

वाढदिवस विशेष! बॉलिवूडच्या ‘किंग खान’च्या नावावर आपले नाव ठेवणारा शाहरुख खान

कट्टर विरोधक पाकिस्तानचा धुव्वा उडवत रवी शास्त्री बनले होते ‘चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन’, जिंकली होती ‘ऑडी १००’

एकेकाळचा भारतीय संघाचा ‘पोस्टर बाॅय’ ते सतत चर्चेत राहणारा टीम इंडियाचा प्रशिक्षक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---