भारतीय क्रिकेट संघाचा लेगस्पिनर युझवेंद्र चहल हा सध्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात चालू असलेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेचा भाग नाही. परंतु तो येत्या टी२० मालिकेत खेळताना दिसणार आहे. तत्पुर्वी चहल त्याची पत्नी धनश्री वर्मासह मालदीवमध्ये सुट्ट्या घालवत आहे. यावेळचे फोटो आणि व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
चहल आणि धनश्रीचा साखरपुडा ऑगस्ट महिन्यात पार पडला होता. त्यानंतर डिसेंबर २२, २०२० रोजी चहलने आपली वाग्दत्त वधू धनश्री हिच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. आपल्या लग्नाची बातमी चहलने इंस्टाग्रामद्वारे जाहीर केली होती. गुरुग्राम येथे त्यांनी विवाहसोहळा उरकला होता. कुटुंबीय आणि काही मोजक्या मित्रांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला होता.
लग्नानंतर ही नवविवाहीत जोडी दुबईला हनीमूनसाठी गेली होती. त्यानंतर लगेचच लग्नाच्या दुसऱ्या महिन्यात ते मालदीव येथे दुसऱ्यांदा हनीमूनला गेले आहेत.
धनश्रीने यावेळचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत ती स्विमसूट घालून समुद्र किनाऱ्यावर फिरताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, ‘स्वर्गात काही शानदार क्षण घालवत आहे.’
याबरोबरच चहलनेही त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोघांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत दोघेही समुद्रकिनाऱ्यावर थांबून एकमेकांच्या डोळ्यात पाहताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडिओला आणि फोटोला नेहमीप्रमाणे हजारोंच्या घरात लाईक्स मिळाल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CLwZlCaMqVl/?utm_source=ig_web_button_share_sheet
https://www.instagram.com/p/CLwTsVLp1C4/?utm_source=ig_web_button_share_sheet
अठ्ठावीस वर्षीय चहल भारताचा प्रमुख फिरकी गोलंदाज आहे. भारताकडून त्याने ५४ वनडे सामन्यात ९२ बळी तर ४५ टी-२० सामन्यात ५९ बळी पटकाविले आहेत. नुकत्याच ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या वनडे आणि टी२० मालिकेत त्याने चमकदार कामगिरी केली होती. चहलची पत्नी धनश्री ही नृत्य दिग्दर्शिका, युट्युबर आणि डॉक्टर आहे. तसेच, सोशल मीडियावर ती सक्रिय राहते.
महत्त्वाच्या बातम्या-
एका वर्षापुर्वी भारतीय संघातील स्थान नव्हते पक्के, आज तोच बनलाय सर्वात मोठा ‘मॅच विनर’
आठवणीतील १९८७ विश्वचषक : विवियन रिचर्ड्स यांनी कराचीतील मैदानावर आणले होते तुफान
अक्षर पटेलने केला खुलासा ‘या’ कारणामुळे रिषभ पंत त्याला म्हणतो ‘वसिम भाई’