नववर्षात भारतीय क्रिकेट संघ आपल्या मोहिमेची सुरुवात मंगळवारी (3 जानेवारी) करेल. भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत सहभागी होईल. ताज्या दमाच्या भारतीय संघाकडून सर्वांना मोठ्या अपेक्षा आहेत. त्याचवेळी संघाचा सदस्य असलेला अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहल याच्यावर देखील सर्वांची नजर असेल. चहलकडे या मालिकेत भारताचा सर्वात यशस्वी टी20 गोलंदाज होण्याची संधी असेल.
मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर या मालिकेला सुरुवात होईल. भारतीय संघाचे नेतृत्व अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्याकडे आहे. या संघात सर्वात अनुभवी गोलंदाज म्हणून फिरकीपटू युजवेंद्र चहल सहभागी होईल. त्याच्याकडे या सामन्यात चार बळी घेतल्यास भारतात सर्वात यशस्वी टी20 गोलंदाज होण्याची संधी असेल. चहलने आतापर्यंत भारतीय संघासाठी 71 टी20 सामने खेळताना 87 बळी टिपले आहेत. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा 90 बळींसह सध्या या यादीत अव्वलस्थानी आहे. चहल या मालिकेतील सर्व सामने खेळण्याची शक्यता असल्याने, तो हा विक्रम आपल्या नावे करू शकतो.
याव्यतिरिक्त त्याने मालिकेत पाच बळी मिळवल्यास मायदेशात टी20 क्रिकेटमध्ये 50 बळी मिळवणारा तो चौथा गोलंदाज ठरेल. त्याच्यापूर्वी, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी (78), न्यूझीलंडचा फिरकीपटू ईश सोढी (57) व बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन (52) यांनी अशी कामगिरी केली आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ-
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन, राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी व मुकेश कुमार.
(Yuzvendra Chahal Chance To Become Most Successful T20 Bowler Of India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ज्याचा बीसीसीआयने केला अपमान तोच बनणार निवडकर्ता; ‘या’ नव्या नावांचीही चर्चा
व्यस्त वेळापत्रकामुळे किवी गोलंदाजाला आले टेंशन, भारत-पाकिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेतून घेतली माघार