अहमदाबाद। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात रविवारपासून (६ फेब्रुवारी) ३ सामन्यांची वनडे मालिका (INDvWI ODI Series) सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय ठरवत वेस्ट इंडीजला अवघ्या १७६ धावांवर गुंडाळले. भारताचा अनुभवी लेगस्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने या सामन्यात चार बळी मिळवत भारतासाठी सर्वात उत्तम कामगिरी केली. त्याचवेळी त्याने एका नव्या विक्रमला ही गवसणी घातली.
चहलची शानदार कामगिरी
अहमदाबाद येथे खेळला जात असलेला हा सामना भारतीय क्रिकेट इतिहासातील १००० वा सामना होता. या सामन्याला संस्मरणीय बनवत भारताचा प्रमुख फिरकीपटू असलेल्या चहलने अप्रतिम कामगिरी केली. त्याने या सामन्यातील आपल्या पहिल्याच षटकात निकोलस पूरनला पायचीत करत त्याने वनडे कारकीर्दीतील आपला १०० वा बळी (Yuzvendra Chahal 100 ODI Wickets) मिळवला. त्यानंतर त्याने पुढच्या चेंडूवर विरोधी संघाचा कर्णधार कायरन पोलार्डला तंबूचा रस्ता दाखवला. त्याने या सामन्यात ९.५ षटके गोलंदाजी करताना ४९ धावा देत सर्वाधिक ४ बळी टिपले.
भारतासाठी सर्वात वेगवान १०० वनडे बळी घेण्याचा विक्रम वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या नावे आहे. त्याने ५६ चेंडूंमध्ये ही कामगिरी केली होती. त्यानंतर या यादीत दुसर्या स्थानी जसप्रीत बुमराह आहे. त्याने ५७ सामन्यांत ही कामगिरी करून दाखवली होती. तिसर्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या कुलदीप यादव व इरफान पठाण यांनी अनुक्रमे ५८ व ५९ सामन्यात ही कामगिरी करून दाखवली होती.
भारतीय संघाचे अप्रतिम गोलंदाजी
अहमदाबाद येथे सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी लाजवाब कामगिरी केली. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट सांघिक कामगिरी करताना वेस्ट इंडीजला अवघ्या १७६ धावांवर सर्वबाद केले. भारतासाठी चहलने सर्वाधिक ४ तर अष्टपैलू वाशिंग्टन सुंदर याने तीन बळी टिपले.
महत्वाच्या बातम्या-
“…आणि तेव्हापासून आम्ही मित्र बनलो”; विराटसोबतच्या मैत्रीवर व्यक्त झाला एबी
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेत टीम इंडियाने ‘अशाप्रकारे’ लता मंगेशकर यांना वाहिली श्रद्धांजली