नवी दिल्ली। भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहलने शनिवारी (८ ऑगस्ट) प्रसिद्ध यूट्यूबर धनश्री वर्मासोबत साखरपुडा करत सर्व चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या चहलने आपल्या ‘रोका’चा फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे. त्यानंतर चहल आणि धनश्री सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.
भल्या भल्या फलंदाजांना क्लीन बोल्ड करणाऱ्या चहललाच बोल्ड करणारी सुंदर धनश्री वर्मा नक्की आहे तरी कोण तसेच त्यांची पहिली भेट कशाप्रकारे झाली होती, हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
धनश्री एक प्रसिद्ध यूट्यूबर, डान्सर, कोरिओग्राफर आणि मेडिकल स्टुडंट राहिली आहे. चला तर या दोघांची भेट कशी झाली हे जाणून घेऊया.
अशाप्रकारे झाली चहल आणि धनश्रीची पहिली भेट
विशेष म्हणजे न्यूझीलंंड दौऱ्यानंतर सर्व भारतीय खेळाडू कोरोना व्हायरसमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचे पालन करत आहेत. त्यामुळे खेळाडू काही महिने मैदानापासून दूर आणि सोशल मीडियाच्या अगदीच जवळ आले होते. चहलच्या जवळच्या मित्राने सांगितल्याप्रमाणे, चहल आणि धनश्रीची पहिली भेट ही मुंबईमध्ये एका कार्यक्रमादरम्यान झाली होती. जिथे धनश्री आपल्या डान्स अकादमीच्या एका प्रमोशनल कार्यक्रमासाठी आली होती. तरीही दोघांमधील जवळीक वाढायला लॉकडाऊननंतर सुरुवात झाली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चहल आणि धनश्रीमधील प्रेमाची सुरुवात एप्रिल २०२० महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून झाली. चहल नेहमी धनश्रीच्या इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट करताना दिसत आहे.
धनश्रीच्या डान्स क्लासेसचाही भाग बनला होता चहल
लॉकडाऊनदरम्यान जिथे अधिकतर गोष्टी व्हर्च्युअल पद्धतीने होत आहेत, त्यामध्ये चहल आणि धनश्री यांची भेटही व्हर्च्युअल पद्धतीने होत होती. लॉकडाऊन दरम्यान चहलने धनश्रीकडून अनेक डान्स क्लासेस घेतल्या आणि तिच्या ऑनलाईन वर्कशॉपचा भागही बनला. यादरम्यान चहलने धनश्रीसाठी आपला एक डान्स व्हिडिओही अपलोड केला होता. ज्यामध्ये तो ‘स्लो मोशन’ या गाण्यावर डान्स करताना दिसत होता. तरीही लॉकडाऊन संपल्यानंतर या दोघांची बाहेरही भेट झाली.
२३ जुलैला धनश्रीने चहलसाठी लिहिला होता मेसेज
धनश्रीने चहलच्या वाढदिवसादिवशी चहलचा डान्स व्हिडिओ शेअर करत पहिल्यांदा सोशल मीडियावर आपले प्रेम व्यक्त केले आणि त्याच्यासाठी एक प्रेमळ मेसेजही लिहिला होता.
आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करत धनश्रीने लिहिले होते की, “मला सांगायचे आहे की तुमच्या या डान्स शिक्षकाने तुमची विकेट घेतली आहे. आपण त्या खास लोकांपैकी एक आहात जे सर्वात मनोरंजक विद्यार्थी तसेच एक अतिशय हुशार व्यक्तिमत्व आहे. आमच्या उजव्या लेग स्पिनरसह स्लो मोशनचा अनुभव घ्या.” यासोबतच धनश्रीने विंकवाला इमोजीही पोस्ट केला होता.
धनश्रीच्या या पोस्टवर चहलने किस वाला इमोजी टाकत लिहिले होते की, प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद!.
https://www.instagram.com/p/CC-ySoTlk52/?utm_source=ig_web_copy_link
आयपीएलनंतर करणार आहेत लग्न
विशेष म्हणजे कोरोना व्हायरसदरम्यान १९ सप्टेंबरपासून आयपीएल २०२०ची सुरुवात होणार आहे. ज्याच्या तयारीसाठी सर्व संघ २० ऑगस्टपासून यूएईसाठी रवाना होणार आहेत. चहलने आयपीएलमध्ये भाग घेण्यापूर्वी धनश्रीसोबत शनिवारी (८ ऑगस्ट) रोका केला आणि ही सुंदर जोडी आयपीएलनंतर डिसेंबरपर्यंत लग्न करतील अशी अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-ब्रेट लीची भविष्यवाणी कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली ‘हा’ संघ जिंकणार आयपीएलचे विजेतेपद
-सचिन, गांगुली, सेहवाग नाही तर ‘या’ भारतीय फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी करताना शोएब अख्तरला यायचे टेंशन
-३० शतके आणि २५० विकेट्स घेणारा ‘हा’ खेळाडू गाजवणार रणजी क्रिकेट
ट्रेंडिंग लेख-
-अ दर्जाच्या क्रिकेटमधील ५ दिग्गज भारतीय खेळाडू, जे वनडे क्रिकेटमध्ये ठरलेत फ्लॉप
-या १० फलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये मारलेत सर्वाधिक षटकार; एका भारतीयाचाही आहे समावेश
-आयपीएलमध्ये एकही षटकार मारता न आलेले 3 खेळाडू