युझवेंद्र चहल आयपीएल २०२२ मध्ये राजस्थान राॅयल्स संघाचा भाग आहे. त्याला मेगा लिलावात राॅयल्स चॅलेंजर्स बॅंगलोर संघाने रिटेन केले नाही. तो आरसीबी संघासोबत २०१४पासून होता. आयपीएलच्या १५व्या हंगामात आरसीबीने विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराजला रिटेन केले, परंतु चहलला रिटेन केले नाही. पैशांवरून संघ व्यवस्थापनासोबत त्याचा वाद झाला होता. याबाबत आता युझवेंद्र चहलने मोठा खुलासा केला आहे. त्याने एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.
युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) माध्यमांशी बोलताना म्हणाला की, “मी हा विचार कधी केला नव्हता की, मी दुसऱ्या संघासाठी खेळेस. वास्तवात असे आहे की, आरसीबीच्या माइक हेसन यांनी मला फोन केला आणि म्हणाले, ऐक युझी, तीन रिटेन (विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज) केलेले खेळाडू आहेत. त्यांनी मला विचारले नाही की, तुला संघात रिटेन व्हायचे आहे की नाही किंवा संघाला मला रिटेन करायचे आहे की नाही. त्यांनी फक्त तीन रिटेन खेळाडूंबद्दल सांगितले आणि मला सांगितले की, आम्ही लिलावात तुला खरेदी करू. मला पैशांबाबत काहीच विचारण्यात आले नाही आणि रिटेनबाबत कोणताही प्रस्ताव संघ व्यवस्थापनाकडून मला मिळाला नाही. परंतु मी बेंगलोर संघाच्या चाहत्यांविषयी नेहमीच आभारी राहील. मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो.”
चहल पुढे म्हणाला की, “त्यांनी (आरसीबी) मला कधीही विचारले नाही. त्यांनी मला फक्त फोन केला आणि रिटेन केलेल्या खेळाडूंबद्दल सांगितले. जर त्यांनी मला विचारले असते की, संघासोबत रिटेन व्हायचे आहे का? तर मी हो म्हणालो असतो. कारण पैसे माझ्यासाठी दुसऱ्या स्थानी आहे. आरसीबीने मला खूप काही दिले आहे, त्यांनी मला प्लॅटफाॅर्म दिला आहे. मला खूप प्रेम आणि समर्थन दिले आहे. चाहत्यांनी मला खूप प्रेम दिले आहे. हा मी भावनात्मक रुपाने आरसीबीशी जोडलो गेलो आहे.”
चहलने आरसीबी संघाकडून ११३ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ७.५८च्या इकॉनॉमी रेटने १३९ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलच्या १५व्या (IPL 2022) हंगामात त्याला राजस्थान संघाने ६.५ कोटी देऊन विकत घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हात सोडू नको, साथ सोडू नकोस,’ अक्षर पटेलची ललितला साद
परफेक्ट ‘टी२० पॅकेज’ असलेला अभिनव मनोहर, ज्याने हार्दिकच्या गुजरातला जिंकून दिली पहिलीच आयपीएल मॅच
आता कसं करू? ‘मोठ्या’नेच घेतली ‘छोट्या’ची विकेट, हार्दिकच्या विकेटवर असा रिऍक्ट झाला कृणाल