---Advertisement---

आरसीबीच्या खेळाडूला हवी आहे ओपनिंगची जागा, भांडला थेट कोचशी

On: सोमवार, सप्टेंबर 14, 2020 8:05 AM
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल दोन गोष्टींमुळे ओळखला जातो. केवळ मैदानावरील गोलंदाजीसाठीच नव्हे तर हा खेळाडू सतत सोशल मीडियावर विनोद करण्यातही पुढे असतो. अनेक वेळा तो आपले संघसहकारी, व्यवस्थापन यांच्याशी मस्ती करताना दिसतो.

चहलने अनेकदा असे म्हटले आहे की त्याला फलंदाजी आवडते. फलंदाजीमध्ये संघाने त्याला अव्वल क्रमांकावर खेळायला येण्याची संधी द्यावी.

भारतीय संघात ही इच्छा पूर्ण न झाल्यास चहलने आयपीएलमध्ये ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा त्यांचे ऐकले गेले नाही, तेव्हा तो माईक हेसनला त्रास देताना दिसला.

चहलने प्रशिक्षकाबरोबर खास छायाचित्रे केली शेअर

युजवेंद्र चहल मैदानावर गोलंदाजी करण्याव्यतिरिक्त त्याच्या अशाच गोष्टींमुळेही ओळखला जातो. लॉकडाऊनमध्ये त्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला विनंती केली की, तिने त्याची शिफारस ओपनिंगच्या जागेसाठी करावी.

तेथे त्याची काहीच चालली नाही, परंतु जेव्हा त्याने पुन्हा आरसीबी व्यवस्थापनाला विनंती केले तेव्हा पुन्हा नकार ऐकायला मिळाला .

याची छायाचित्रे युजवेंद्र चहलने सोशल मीडियावर शेअर केली आहेत. तो प्रशिक्षक हेसनचा हात मोडत त्याच्याशी भांडताना दिसत होता. छायाचित्रांच्या कॅप्शनमध्ये चहलने लिहिले आहे, “जेव्हा तुम्ही प्रशिक्षकाला सलामीसाठी जायला विचारले असता तो नकार देतो.”

तथापि, इमोजीवरून हे स्पष्ट झाले की चहल विनोदांमध्ये सर्व काही बोलत आहे.

आरसीबीने चहलच्या फलंदाजीची आकडेवारी केली शेअर

आरसीबीने पोस्टमध्ये 2008-09 मध्ये बेंगलोर येथे झालेल्या कूच बिहार ट्रॉफीची आकडेवारी दिली ाहे. हिमाचल प्रदेश विरुद्ध चहलने 19 वर्षाखालील एका सामन्यात 135 आणि 46 धावा केल्या होत्या आणि संपूर्ण स्पर्धेत 281 धावा केल्या.

फ्रँचायझीने पोस्टसह लिहिले आहे की, “युजी वरच्या क्रमांकावर चांगला खेळ करत असेल. मात्र तो केवळ प्रदर्शनी सामन्यांतच सलामीला येऊ शकतो.”

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---