इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा तेरावा हंगाम सुरु होण्यासाठी जास्त दिवस उरले नाहीत. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान युएईत खेळण्यात येणाऱ्या आयपीएल २०२०च्या तयारीला सर्वजण लागले आहेत. गेल्या ४ महिन्यांपासून लॉकडाऊनमध्ये घरी वेळ घालवलेले क्रिकेटपटू सध्या आपापल्या संघाच्या सराव शिबिरात सामील झाले आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलदेखील बेंगलोरला पोहोचला आहे. दरम्यान आरसीबी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन खेळाडूंचे मजेदार व्हिडिओ शेअर करत आहे.
कोरोना व्हायरसमुळे आयपीएल २०२०चे आयोजन भारताबाहेर युएईत करण्यात आले आहे. त्यापुर्वी बीसीसीआयने सर्व फ्रंचायझींना एसओपी दिला आहे. सर्व खेळाडूंना, कर्मचाऱ्यांना एसओपीचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. त्यामुळे चहलदेखील आपल्या इतर संघसहकाऱ्यांप्रमाणे बेंगलोरमध्ये सेल्फ आयसोलेशमध्ये आहे. दरम्यान चहलचा हॉटेलमधील आपल्या रुमबाहेर जातानाचा एक मजेदार व्हिडिओ आरसीबीने शेअर केला आहे.
झाले असे की, चहल हॉटेलमधील त्याच्या रुममधून बाहेर निघत होता आणि ऑफिशियलने त्याला असे करण्यापासून थांबवले. या व्हिडिओत चहल आपल्या रुममधून पाय बाहेर ठेवत आहे आणि परत आत घेत आहे. असे करत तो मजेत, ‘ले जा रे मुझे बाहर तू’, असे म्हणत आहे.
‘Quarantine Yuzi’ has his countdown priorities sorted. Never a dull moment when @yuzi_chahal is around! 😂😁#PlayBold #BoldDiaries #IPL2020 pic.twitter.com/MEED3v2YCL
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) August 17, 2020
चहलव्यतिरिक्त आरसीबीचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आणि उमेश यादवही बेंगलोरला पोहोचले आहेत. आरसीबी २१ ऑगस्टला युएईला जाणार आहे. तिथे गेल्यानंतर सर्व खेळाडूंना एका आठवड्यासाठी सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येईल. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीही १-२ दिवसांत बेंगलोरला पोहोचणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
राशिद खानने असा काही षटकार मारला की सर्वजण पहातच राहिले!
सीपीएल २०२० ड्रीम ११ : गयाना अमेझॉन वॉरियर्स विरुद्ध सेंट किट्स नेव्हीस पॅट्रीयॉट्स
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: या ३ खेळाडूंची मुंबई इंडियन्सला भासू शकते उणीव
‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीचे ५ असे निर्णय, ज्याचा झाला टीम इंडियाला मोठा फायदा
या ४ अभिनेत्रींबरोबर जोडले गेले होते एमएस धोनीचे नाव