संपूर्ण भारत देश सध्या कोरोना वायरसच्या दुसर्या लाटेत अडकला आहे. सध्या रुग्णालये रूग्णांनी पूर्ण भरलेली आहेत. यावेळी संपूर्ण देश कोरोनाविरूद्ध युद्ध लढत आहे. गेल्या दोन महिन्यांत हजारो सोशल मीडिया वापरणारे लोक मदतीसाठी निधी गोळा करण्यात गुंतले आहेत. अशाच प्रकारच्या क्राऊडफंडिंग प्लॅटफॉर्मद्वारे भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलने बंगळुरुच्या एका रुग्णाला आर्थिक मदत केली आहे.
चहलने कोरोनाविरुद्ध लढत असलेल्या बंगळुरुच्या रुग्णाला 2 लाख रुपयांची देणगी दिली आहे. अलीकडेच त्याने भारतीय कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी चालविलेल्या मोहिमेमध्ये 95 हजार रुपयांची देणगी दिली होती. विराट आणि अनुष्काने या निधीतून 11 कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा केली आहे.
बेंगळुरूच्या एका रूग्णासाठी 4 लाख रुपयांचा निधी गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी चहलने 2 लाख रुपयांची मदत केले. रुग्णाच्या ओळखीतल्या एका व्यक्तीने सांगितले की कोरोनाविरूद्ध लढणार्या त्याच्या मित्राच्या कुटूंबातील सदस्यासाठी, अमुधासाठी निधी गोळा करत आहेत. जे बेंगळुरूमधील सेंट जॉन मेडिकल कॉलेजच्या आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर आहेत. उपचाराचा खर्च भागविण्यासाठी कुटुंबाने जे काही करता येईल ते केले, परंतु अद्याप 4 लाख रुपयांची आवश्यकता होती. त्यानंतर रुग्णाच्या ओळखीतल्या व्यक्तीने केटोमार्फत मदत मागितली.
भारतातील कोरोना विरुद्धच्या लढाईत चहल व्यतिरिक्त अनेक क्रिकेटपटू देखील मदतीसाठी पुढे आले आहेत. भारतात कोरोनाचा तीव्र उद्रेक वाढला असून दररोज साडेतीन लाख रुग्ण पॉझिटिव आढळत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ हंगामात ‘हा’ संघ चॅम्पियनसारखा दिसला, गावसकरांनी केले कौतुक
WTC Final: खरंच का; ‘भूवी’ची भारतीय कसोटी संघात निवड न होण्यामागे त्याचाच हात!