विराट कोहलीनंतर भारतीय संघाची सूत्रे रोहित शर्मा याच्या हाती गेली आहेत. रोहितने तिन्ही क्रिकेट स्वरूपात भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर शानदार प्रदर्शन केले आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली भारताने वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेला पराभूत केले आहे. मात्र कर्णधार म्हणून रोहितपुढील पहिले आणि सर्वात मोठे आव्हान असेल, २०२२ अंती ऑस्ट्रेलियात होणारा टी२० विश्वचषक. मात्र भारताचा अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल याला विश्वास आहे की, रोहितच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघ हे आव्हान सहज पार करेल.
भारतीय संघाने एमएस धोनी याच्या नेतृत्त्वाखाली २०१३ मध्ये चँपियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर भारतीय संघ एकही आयसीसी स्पर्धा जिंकू शकलेला नाही.
‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना चहल (Yuzvendra Chahal On Rohit Sharma) म्हणाला की, “मला विश्वास आहे, रोहित भैया (Rohit Sharma) भारताला नक्कीच विश्वचषक ((T20 World Cup) जिंकून देईल. आमच्याकडे एक मजबूत संघ आहे. प्रतिभाशाली क्रिकेटपटूंचा गट आमच्याकडे आहे. भारतीय संघाकडे १५-२० खेळाडू असे आहेत, जे शानदार प्रदर्शन करू शकतात. आमच्याकडे अतिशय मजबूत संघ आहे. त्यामुळे यंदा आमच्याकडे विश्वचषक जिंकण्याची चांगली संधी आहे.”
कुलदीप यादवबद्दलची चहलने दिली प्रतिक्रिया
भारतीय क्रिकेटमध्ये कुलचा जोडीचे पुनरागमन झाले आहे. कुलदीप यादवच्या यशस्वी पुनरागमनासाठी चहल आनंदी आहे. २०१९ पर्यंत क्रिकेटमंचावर या जोडीने धुमाकूळ घातला होता.
आपल्या गोलंदाजी जोडीदाराबद्दल बोलताना चहल म्हणाला की, “मी खूप खुष आहे. कुलदीप माझ्या लहान भावासारखा आहे. मैदानावर व मैदानाबाहेर आम्ही खूप चांगला वेळ घालवला आहे. तो दुखापतीनंतर पुनरागमन करत. ऑन द फिल्ड असताना मी त्याला खूप मिस केले आहे. दीर्घ काळानंतर त्याचे पुनरागमन झाल्यावर मी त्याला घट्ट मिठी मारली होती. मला त्याच्यासोबत गोलंदाजी करायची आहे आणि एकत्र मिळून अधिकाधिक विकेट्स घ्यायच्या आहेत. कुलचा जोडी पुन्हा क्रिकेटवर राज्य करेल.”
२०२२ अंती होणार टी२० विश्वचषक
१६ ऑक्टोबर २०२२ रोजी आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेची सुरुवात होणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी विश्वचषकातील अंतिम सामना खेळवला जाईल. टी२० विश्वचषकाचे यजमानपद ऑस्ट्रेलियाकडे असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! सेमीफायनलच्या एक दिवस आधीच वेस्ट इंडिजला झटका; ‘या’ अनुभवी गोलंदाजाला कोरोनाची लागण
‘माझी आई माझ्याशी २७ वर्षे खोटं बोलली’, असं का म्हणाला केएल राहुल?
‘अजेय’ ऑस्ट्रेलियाचं सेमीफायनलमध्ये बिघडणार गणित? स्टार अष्टपैलू महत्त्वपूर्ण सामन्यातून बाहेर
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://chat.whatsapp.com/BwXS4mmGcr33RyGkLOvfGT