क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या क्रिकेटपटूंवर चित्रपट बनणे ही काही नवी गोष्ट नाही. यापुर्वी सचिन तेंडूलकर, एमएस धोनी, मोहम्मद अझरुद्दीन अशा बऱ्याचशा भारतीय क्रिकेटपटूंच्या जिवनावर आधारित चित्रपट (बायोग्राफी) बनले आहेत. भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल यानेही त्याची बायोग्राफी बनल्यास त्याच्या असणाऱ्या इच्छा व्यक्त केल्या आहेत. त्याने आपल्या बायोग्राफीतील अभिनेता आणि अभिनेत्रीची नावे सांगितली आहेत.
चहलने वेबसाईट क्रिकट्रॅकरला बोलताना सांगितले की, “जर कधी माझ्या जीवनावर चित्रपट बनला; तर त्यामध्ये बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याने त्याची भूमिका साकारावी. त्याचबरोबर माझ्या चित्रपटातील अभिनेत्रीचे अर्थातच पत्नी धनश्री वर्माची भूमिका बॉलीवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ हिने साकारावे.” चहलने एक प्रश्नाचे उत्तर देताना कॅटरिना आपली क्रश असल्याचेही सांगितले आहे.
चहलला याच दरम्यान एक प्रश्न विचारला गेला की, भारतीय संघानंतर कोणता संघ सर्वोत्कृष्ट आहे असे वाटते? तर त्याने न्युझीलंड संघाचे नाव घेतले. याच न्यूझीलंड संघाविरुद्ध भारतीय संघ 18 जूनपासून विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळणार आहे. परंतु चहल या सामन्याचा भाग नसेल. परंतु जुलै महिन्यातील भारताच्या श्रीलंका दौऱ्यावर त्याला संधी मिळू शकते. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ सामन्यांची वनडे आणि टी२० मालिका खेळायची आहे.
युजवेंद्र चहलने 2016 मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते. चहलने आतापर्यंत भारतासाठी 48 टी20 सामने आणि 54 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्या सामन्यात त्याने 154 बळी घेतले आहेत.
चहलची पत्नी धनश्री वर्मा एक डान्स कोरियोग्राफर आहे. तिचे डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घालतात. मागच्या वर्षी जुलैमध्ये दोघांनी साखरपुडा केला होता नाही. त्याच वर्षात डिसेंबरमध्ये त्यांनी लग्नही केले.
महत्त्वाच्या बातम्या-
असं कोण रेनकोट घालतं! लॉर्ड्स कसोटीत दर्शकाची भलतीच कृती, दर्शकांसह समालोचकही लोटपोट
कसोटी चॅम्पियनशीप अंतिम सामन्यापुर्वी ‘फॉलोऑन’ नियमाबाबत आयसीसीची मोठी घोषणा, वाचा सविस्तर
‘तो भारताचा थ्रीडी खेळाडू, त्याला संघाबाहेर करणं कठीण’; पाकिस्तानी खेळाडूकडून स्तुती