सोशल मीडियावर सर्वात सक्रिय असणाऱ्या सेलिब्रिटी दाम्पत्यांपैकी एक दाम्पत्य म्हणजे, भारताचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा. आपले नवनवीन फोटो असो वा व्हिडीओ सोशल मीडियावर सतत पोस्ट केल्याने ते नेहमी चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनत असतात. या जोडीने पुन्हा एकदा आपला एक रोमँटिक असा फोटो चाहत्यांच्या भेटीला आणला आहे.
चहलने आपली पत्नी धनश्रीसोबत आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो अपलोड केला आहे. ज्यात ते दोघे एकमेकांच्या डोळ्यात बघत आहे. त्यांचा हा फोटो हुबेहूब बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल यांच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटातील एका सीनसारखा भासत आहे. त्यांनी अगदी त्या सीनप्रमाणे मोहरीच्या शेतात हा फोटो काढला आहे. सोबतच शाहरुख आणि काजोलप्रमाणे पोषाखही परिधान केले आहेत.
हा फोटो शेअर करत चहलने ‘गोरी तेरी आँखें कहें’, या कॅप्शनचा उल्लेख केला आहे. त्यांचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला असून त्यावर प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे.
https://www.instagram.com/p/CLGsSBrh3a0/?utm_source=ig_web_button_share_sheet
धनश्री हिने नुकताच क्रिकेटपटू श्रेयस अय्यरसोबत देखील एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. ती सतत व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करून चाहत्यांचे मनोरंजन करत असते. धनश्री हिप हॉपची ट्रेनिंग तर देतेच सोबतच तिचा ‘धनश्री वर्मा युट्युब चॅनेल’ नामक एक चॅनेल आहे, ज्यात ती आपल्या डान्स अकादमीचे व्हिडिओ अपलोड करते. तिच्या या चॅनेलचे पंधरा लाखांहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत. ती डॉक्टर असून तिने नवी मुंबईच्या डी वाय पाटील डेंटल कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे.
मागील वर्षी या दाम्पत्याने साखरपुडा केला होता त्यानंतर चहल आयपीएलसाठी दुबईला गेला होता. तेव्हा धनश्री चहलच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे समर्थन करण्यासाठी युएईला गेली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून आल्यावर या दोघांनी हिंदू पद्धतीनुसार लग्न केले.
युजवेंद्र चहलने आतपर्यंत ५४ वनडे सामने खेळले असून ९२ विकेट्स घेतल्या आहेत. तर आपल्या ४५ टी-२० आणि ९९ आयपीएल सामन्यात त्याने अनुक्रमे ५९ आणि १२१ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिले पराभव वरुन मोठा धक्का..! भारताचा ‘हा’ धाकड अष्टपैलू कसोटीसह टी२० मालिकेतूनही बाहेर?
टीम इंडियाची काळजीत घट! दुसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या ‘या’ घातक गोलंदाजाला दिली जाणार विश्रांती
काय सांगता! रविंद्र जडेजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती? जाणून घ्या खरं काय ते