---Advertisement---

“तर सांग कोणाची विकेट घेऊ”, युजवेंद्र चहलचा विराट कोहलीसाठी स्पेशल मेसेज

Yuzvendra-chahal,-Virat-Kohli
---Advertisement---

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने शनिवारी (१५ जानेवारी ) कसोटी संघाचे कर्णधारपद (Virat Kohli test captaincy) सोडण्याचा निर्णय घेतला होता. तब्बल ७ वर्ष ही भूमिका योग्यरीत्या पार पाडल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला. या निर्णयानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. तसेच अनेकांनी त्याच्या या निर्णयाचे स्वागत करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. दरम्यान भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने (Yuzvendra chahal tweet) देखील विराट कोहलीसाठी खास ट्विट केले आहे.

युझवेंद्र चहल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वनडे (Sa vs Ind odi series) मालिकेत खेळताना दिसून येणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी त्याने एक खास ट्विट केले. ज्यामध्ये त्याने लिहिले की, “सांगा कोणाला बाद करू भाई. एकमेकांना समजून घेण्यापासून ते एकमेकांवर विश्वास ठेवण्यापर्यंतचा प्रवास निश्चितच माझ्या कायम लक्षात राहील. समान भावना आणि उच्च प्रदर्शनासह पुढे जिंकण्यासाठी आणखी बरेच सामने आहेत.”

युझवेंद्र चहलपूर्वी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने देखील विराट कोहलीसाठी भावूक करणारी पोस्ट शेअर केली होती. त्याने आपल्या पोस्ट मध्ये विराट कोहली सोबतचा फोटो शेअर करत लिहिले होते की, “माझ्या सुपर हिरोसाठी. मला तुझ्याकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल आभार मानणे पुरेसे नाही. तू नेहमीच माझ्यासाठी एका मोठ्या भावासारखा राहिला आहेस. माझ्यावर विश्वास दाखवण्यासाठी आभार. किंग कोहली तू नेहमीच माझा कर्णधार राहशील.”

https://www.instagram.com/p/CY17R6drRWg/?utm_medium=copy_link

युझवेंद्र चहल काही महिने भारतीय संघाबाहेर राहिल्यानंतर पुन्हा एकदा पुनरागमन करतोय. तसेच बुधवार (१९ जानेवारी ) पासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेत त्याला खास विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे. युझवेंद्र चहलला वनडे क्रिकेटमध्ये १०० गडी बाद करण्याची सुवर्णसंधी आहे. हा कारनामा करण्यासाठी त्याला केवळ ३ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवायचा आहे. असा कारनामा करणारा तो २३ वा भारतीय गोलंदाज ठरेल.

तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला वनडे सामना पार्लच्या मैदानावर पार पडणार आहे. कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय संघ वनडे मालिकेत विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

केवळ ३ विकेट्स अन् चहल ‘या’ खास शतकासह दक्षिण आफ्रिकेविरुद्ध करणार मोठा विक्रम

टीम इंडियाला दिलासा! दक्षिण आफ्रिकेचा ‘सबसे बडा मॅचविनर’ वनडे मालिकेतून बाहेर

हे नक्की पाहा:

सचिन-कांबळीच्या करामतीने गांगुलीच्या रुममध्ये झालेलं पाणीच पाणी| Sachin-Kambli Prank on Ganguly

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---