---Advertisement---

काय सांगता! विराट कोहली, केएल राहुल करत आहेत चहलच्या शॉटची कॉपी?

On: बुधवार, जानेवारी 29, 2020 7:13 PM
---Advertisement---

क्रिकेट जगतात क्रिकेटपटूंनी शेअर केलेल्या पोस्ट्स चर्चेचे कारण बनत असतात. अशाच प्रकारे भारताचा फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) शेअर केलेली ट्विटर पोस्ट चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्याने गमतीने म्हटले आहे भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि सलामीवीर फलंदाज केएल राहुल (KL Rahul) त्याच्या शॉटचे अनुकरण करत आहेत.

त्याचबरोबर त्याने या दोन्ही खेळाडूंच्या फोटोसोबत आपला फोटो कोलाज करत ट्विटरवर शेअर केला आहे.

विराट आणि राहुलला ट्विटरवर ट्रोल (Troll) करत चहलने लिहिले की, “जेव्हा हे खेळाडू माझ्या शाॅटचे अनुकरण (Copy) करतात, यात काही वाईट नाही. युवकांनो असेच करत रहा.” ही पोस्ट शेअर करताना चहलने यामध्ये हसणाऱ्या इमोजीचाही समावेश केला आहे.

असा प्रकार फक्त चहलनेच केलेला नाही तर विराटनेही यापूर्वी चहलच्या फलंदाजीवर त्याची चेष्टा केली होती.

सध्या भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर (Tour of New Zealand) आहे. या दौऱ्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) आंतरराष्ट्रीय टी20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिले 2 सामने भारतीय संघाने जिंकले आहेत.

त्याचबरोबर आज (29 जानेवारी) या दोन संघात तिसरा टी20 सामना पार पडला. हा सामना भारताने सुपरओव्हरमध्ये (Super Over) जिंकला असून 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

चहलने आतापर्यंत 39 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 23.33 च्या सरासरीने 53 विकेट्स घेतले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---