भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या हंगामात पुन्हा एकदा चमकला. त्याने यावर्षी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आणि पर्पल कॅपचा मानकरी ठरला. हंगामात त्याने एकट्याने विकेट्सची हॅट्रिक घेतली. चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा नेहमीच चर्चेत असतात. अशातच आता आयपीएल संपल्यानंतर धनश्रीने तिचा पती चहलच्या पहिल्या प्रेमाचा खुलासा केला आहे.
आयपीएल २०२२मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळणाऱ्या युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने १७ सामन्यांमध्ये तब्बल २७ विकेट्स घेतल्या. हंगामात घेतली गेलेली एकमात्र हॅट्रिकही चहनेच घेतली होती. संपूर्ण हंगामात चहलची पत्नी धनश्री वर्मा (Dhanshree Verma) राजस्थानच्या बायो बबलमध्ये सहभागी होती. प्रत्येक सामना तिने स्टँड्समधून पाहिला आहे. धनश्रीला राजस्थान रॉयल्सच्या खास पॉडकास्टमध्ये चहलच्या सुंदर हसण्याविषयी प्रश्न विचारला गेला. यावर धनश्रीने असे उत्तर दिले की, “याचे मुख्य कारण म्हणजे, तो सध्या त्याच्या पहिल्या प्रेमाच्या आसपास आहे आणि त्यामुळेच तो आनंदी आहे.”
पॉडकास्टमध्ये बोलताना धनश्रीने सांगितले की, “मैदानातील ताण-तणाव दूर करण्यासाठी चहल त्याच्या हसण्याची मदत घेतो. ती म्हणाली की, “प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर युजी खूप आनंदी व्यक्ती आहे आणि त्याला क्रिकेटशी प्रेम आहे. त्याचे पहिले प्रेम क्रिकेटच आहे. तो नेहमी हसत राहण्याचे मुख्य कारण त्याचे संघातील सहकाऱ्यांच्या आसपासचे वातावरण आहे. मला वाटते की, तुम्ही संतुलन कायम ठेवण्याची गरज असते. वातावरण नक्कीच खूप गरम आणि मैत्रीपूर्ण असते. परंतु हे तणावपूर्ण देखील असते. त्यामुळे तुम्हाला याच्यासोबत राहावे लागेल. त्यामुळेच युजी प्रत्येक वेळी युजीसारखाच असतो.”
🎙 The reason behind Dhanashree’s celebration and more!
▶️ Watch Ep. 06 of the Royals Podcast now.
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) June 5, 2022
दरम्यान, युजवेंद चहल प्रतिनिधित्व करणारा राजस्थान रॉयल्स संघ तब्बल १४ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर यावर्षी आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. दिवंगत शेन वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थानाने पहिल्या आयपीएल हंगामाचे विजेतेपद पटाकावले होते. अशात यावर्षीचे विजेतेपद पटाकवून वॉर्नला श्रद्धांजली देण्याचा राजस्थानचा प्रयत्न होता, पण गुजरात टायटन्सने असे होऊ दिले नाही. अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थानला मात दिली आणि त्यांच्या पदार्पणाच्या सामन्यात विजेतेपद पटकावले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ठरलं तर! एका वर्षात १०० टक्के होणार २ आयपीएल; असं आम्ही नाही, तर ‘हा’ दिग्गज म्हणतोय
आयपीएलचे हिरो, रणजीत झिरो! क्वार्टर फायनलमध्ये गिल-मयंकसह सपशेल फ्लॉप ठरले ‘हे’ क्रिकेटर
हार्दिकवर धोनी आधीपासूनच मेहरबान, पहिल्या तीन सामन्यांमध्येच दिलेली ‘ही’ आनंदाची बातमी