---Advertisement---

‘सूरज की बाहों में..’ गाण्यावरील चहलच्या पत्नीचा भन्नाट व्हिडिओ व्हायरल, लुटला मालदीवच्या सुंदरतेचा आनंद

On: शुक्रवार, मार्च 5, 2021 1:47 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा हे दोघेही सोशल मीडियावर भरपूर ऍक्टिव्ह असतात. हे दोघेही आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करत असतात आणि त्यांचे चाहते या व्हिडिओला चांगला प्रतिसाद देखील करत असतात. हे दोघे सध्या मालदीवमध्ये आपला सुखद वेळ घालवत आहेत. अशातच धनश्रीने इंस्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

चहल आणि धनश्री यांनी यापूर्वी देखील मालदीवमधील काही काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. अशातच तिने गुरुवारी आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती ऋतिक रोशनच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटातील ‘सूरज की बाहो मे’ या गाण्याच्या तालावर, सूर्यास्त होत असताना मालदीवच्या समुद्रकिनारी फिरताना दिसत आहे. तिच्या सुंदर अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

यापूर्वी देखील व्हिडिओ झाला होता व्हायरल

धनश्री ही एक युट्युबर आणि कोरयोग्राफर आहे. यामुळेच ती सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते आणि आपले डान्स करतानाचे व्हिडिओ शेअर करत असते. याआधी देखील तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती क्रिकेटच्या रंगात रंगत डान्स करताना दिसून आली होती. तसे तिने गोलंदाजी आणि फलंदाजी करण्याचा अभिनयदेखील त्या व्हिडिओत केला होता. या व्हिडिओला देखील चाहत्यांनी प्रचंड शेअर केले होते. तसेच पोस्ट केल्यानंतर अवघ्या २ तासातच या व्हिडिओला २ लाख लोकांनी पहिला होते.

https://www.instagram.com/p/CL_y_uuJ7TU/?utm_source=ig_web_button_share_sheet

डिसेंबर महिन्यात युजवेंद्र चहलसोबत बांधली होती लगीनगाठ

भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी ऑगस्ट २०२० मध्ये साखरपुडा केला होता. ही गोड बातमी त्यांनी सोशल मीडियावर शेअर करत आपल्या चाहत्यांना सांगितली होती. त्यांनतर चहल आयपीएल २०२० स्पर्धा खेळण्याकरिता दुबईला गेला होता. दुबई वरून परतल्यानंतर डिसेंबर २०२० रोजी त्यांनी लग्न केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

भावा १ धाव तरी काढू द्यायची! स्टोक्सच्या चेंडूवर यष्टीरक्षकाचा अप्रतिम झेल अन् कोहली तंबूत, पाहा Video

कसोटी चॅम्पियनशिपमध्ये रोहितचा डंका, कोणालाही न जमलेल्या विक्रमाला घातली गवसणी

हिटमॅनचा एकहजारी विक्रम! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा फक्त दुसराच, पाहा पहिलं नाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---